गोवंश जनावरे कत्तली

परभणीत कत्तलीसाठी आणलेले १८ गोवंश जनावरे जप्त

Slaughter of cattle: पाथरी पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेले १८ गोवंश जनावर एका शेडमध्ये आढळून आले. या घटनेत आरोपी नूरमिया शहाबुद्दीन यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांची कारवाई बेकायदेशीर कृत्यांविरोधात होती.

परभणीत कत्तलीसाठी आणलेले १८ गोवंश जनावरे जप्त

Slaughter of cattle

 

एकावर पाथरी पोलिसात गुन्हा दाखल अवैध गोवंश कत्तल करणार्‍यांमध्ये खळबळ...!

परभणी (Slaughter of cattle) : पाथरी  शहरातील मूर्तुजा कॉलनी परिसरात कत्तलीसाठी आणून ठेवण्यात आलेल्या १८ गोवंश जनावरांची सुटका करत पाथरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पोलिसांना शनिवार  ६ जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की, मूर्तुजा कॉलनी येथील मशीदसमोरील मोकळ्या जागेत व शेडमध्ये काही गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणून बांधून ठेवण्यात आली आहेत.

या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब स्वामी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला. यावेळी मोकळ्या जागेत व शेडमध्ये बांधून ठेवलेले कत्तलीसाठी आणलेले एकूण १८ गोवंश जनावरे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ जनावरांना ताब्यात घेत त्यांची सुटका केली. या (Slaughter of cattle) प्रकरणी नूरमिया शहाबुद्दीन कुरेशी (वय ६८, रा. मूर्तुजा कॉलनी, पाथरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान जिल्ह्यात गोवंश कत्तल आणि जनावरांच्या (Slaughter of cattle) अवैध वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने अलीकडील काळात आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने होत असलेल्या धडक कारवायांमुळे अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पाथरी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे  कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांविरोधातील पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वाची ठरत असल्याचे नागरिकांत चर्चा आहे.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026