कारवाडी अवैध जुगार छापा

कारवाडी शिवारात तिर्रट जुगारावर छापा; आठ जणांवर गुन्हा दाखल

Karwadi Gambling Raid: हिंगोली जिल्ह्यातील कारवाडी शिवारातील एक अवैध जुगारासाठी पोलिसांनी छापा मारा. यावेळी आठ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आले. नगद १० हजार ६०० रु. जप्त झाले.

कारवाडी शिवारात तिर्रट जुगारावर छापा; आठ जणांवर गुन्हा दाखल

Karwadi Gambling Raid

हिंगोली (Karwadi Gambling Raid) : ग्रामीण पोलिस ठाणे हद्दितील कारवाडी शिवारातील दक्षता नगरमध्ये तिर्रट जुगार सुरू असताना पोलिसांनी छापा मारून आठ जणांवर गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, २६ जुलै रोजी कारवाडी शिवारातील दक्षता नगर मध्ये अवैध जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांना मिळाल्याने त्यांनी पोलिस पथकाला तात्काळ घटनास्थळी रवाना केले. यावेळी पोलिसांनी मारलेल्या छाप्यात नगदी १० हजार ६०० रुपये जप्त करण्यात आले.

या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शामराव जवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंधू लक्ष्मण गडाळे, शेख साजेश शेख लाल रा. रिसाला बाजार हिंगोली, जुनेदखान गफारखान पठाण रा. आजम कॉलनी हिंगोली, शंकर प्रकाश सावळे रा. नवीन पोलिस कॉलनी हिंगोली, लक्ष्मण भानुदास वाव्हळ रा. दाटेगाव ता.जि. हिंगोली, निलेश पंडीत देशमुख रा. आनंद नगर हिंगोली, राहूल प्रकाश जाधव रा. रामाकृष्णा कॉलनी हिंगोली, शंकर नागोराव गिरी रा. भांडेगाव ता.जि. हिंगोली या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाळासाहेब खोडवे हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026