हिंगोली मटका जुगार

हिंगोली जिल्ह्यात मटका जुगाराचे १८, अवैध दारू प्रकरणी ४३ गुन्हे दाखल

Hingoli Matka Gambling: हिंगोली जिल्ह्यात १ ते ७ मे दरम्यान मटका जुगार व अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. १८ मटका व ४३ दारू प्रकरणात गुन्हे दाखल.

हिंगोली जिल्ह्यात मटका जुगाराचे १८, अवैध दारू प्रकरणी ४३ गुन्हे दाखल

Hingoli Matka Gambling

 

१ ते ७ मे दरम्यान आठवडाभरातील कामगिरी

हिंगोली (Hingoli Matka Gambling) : नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ७ मे या पहिल्या आठवड्यातच हिंगोली जिल्ह्यात मटका जुगाराचे १८ तर अवैध दारू विक्री प्रकरणी ४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेत हिंगोली जिल्हा पोलिसांनी देखील दारू व मटका-जुगाराच्या अवैध धंद्यांवर जोरदार प्रहार केला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यातील १३ ही पोलिस ठाणे हद्दिमध्ये अवैध दारू, मटका जुगार प्रकरणी कारवाई करण्यात आली.

प्राप्त आकडेवारीनुसार, हिंगोली जिल्ह्यात (Hingoli Matka Gambling) मटका-जुगार प्रकरणी १८ गुन्हे दाखल करून २७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून १ लाख ६५ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध दारू विक्री विरोधात जिल्ह्यात सर्वाधिक ४३ गुन्हे नोंदवले गेले. यात ४३ आरोपींवर कारवाई करून १ लाख १६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शस्त्र अधिनियमा खाली १ गुन्हा दाखल करून एका आरोपीकडून २ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. तर इतर कायद्यांअंतर्गत १४ गुन्ह्यांमध्ये १४ आरोपींवर कारवाई करत २ लाख ०३ हजार ८२१ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. एकूणच हिंगोली जिल्ह्यात आठवडाभरात ७६ गुन्हे दाखल होऊन ८५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नांदेड परिक्षेत्रात १ ते ३१ मे २०२६ दरम्यान गुटखा, मटका-जुगार, अवैध दारू विक्री (Hingoli Matka Gambling) व शस्त्र बाळगणे याविरोधात ही विशेष मोहीम राबवली जात आहे. पहिल्याच आठवड्यात गुटखा प्रकरणी ७, जुगार कायद्याखाली ८२, दारूबंदी कायद्यान्वये १९६, शस्त्र अधिनियमाखाली १९ व इतर कलमांखाली ३१ अशा एकूण ३३५ कारवाया करण्यात आल्या. परिक्षेत्रात नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यांत एकाच वेळी ही धडक कारवाई सुरू आहे.  पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले की, ही मोहीम पुढील आठवड्यात अधिक व्यापकपणे राबवली जाणार आहे. अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी नागरिकांनी 'खबर' हेल्पलाइनचा वापर करावा. यासाठी ९१ ५०१०० १०० या मोबाईल क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे माहिती देता येईल. नागरिकांनी बिनधास्तपणे माहिती द्यावी, नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अवैध धंदे चालता कामा नये, कारवाई करा 
जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी अवैध धंदे चालता कामा नये, असा गर्भित इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकार्‍यांना दिल्या असून अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026