Mahajyoti Scholarship Exam

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

Mahajyoti Scholarship Exam

आंबेगाव बुद्रुकमधील सण ब्राईट स्कूल केंद्रावर विद्यार्थिनींचा आरोप; रोहित पवारांचा संताप, अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यात महाज्योतीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा नियोजनाअभावी गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर पोहोचल्या; मात्र केंद्रावर आवश्यक कॉम्प्युटरची व्यवस्था उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला. परिणामी नियोजित वेळेत परीक्षा सुरू होऊ शकली नाही आणि अखेर परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा आज आयोजित करण्यात आली होती. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील सण ब्राईट स्कूल हे परीक्षा केंद्र होते. विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, सकाळी ९ ते ११ अशी परीक्षेची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र वेळ उलटूनही परीक्षा सुरू झाली नाही आणि विद्यार्थिनी परीक्षा केंद्राबाहेरच थांबून राहिल्या.

कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा

परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटरची उपलब्धता नसल्यामुळे परीक्षा घेता आली नसल्याचा दावा विद्यार्थिनींकडून करण्यात आला. सकाळपासून अनेक विद्यार्थिनी अन्न-पाण्याविना परीक्षा केंद्राबाहेर थांबल्या होत्या. मात्र, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला नसल्याचा आरोपही करण्यात आला.

परीक्षेबाबत विचारणा केल्यानंतर विद्यार्थिनींना समाधानकारक माहिती मिळत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापनाविरोधात विद्यार्थिनींमध्ये नाराजी निर्माण झाली. अखेर अधिकाऱ्यांकडून परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

रोहित पवारांचा संताप

या प्रकारावर आमदार रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाज्योतीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची भूमिका घेतली.

महाज्योतीच्या संदर्भातील या प्रकारावरून अतुल सावे यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

महाज्योतीवर ३०० कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप

दरम्यान, महाज्योती संस्थेवर यापूर्वीही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या नावाखाली ३०० कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

निविदा प्रक्रिया न राबवता सुमारे ३०० कोटी रुपयांची कामे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच ५१ टक्के खासगी भागीदारी असतानाही संस्थेला सरकारी स्वरूप असल्याचे भासवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

याशिवाय बोगस विद्यार्थी आणि बनावट प्लेसमेंटच्या माध्यमातून निधी उचलण्यात आल्याचा तसेच प्रशिक्षण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता.

महाज्योतीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील ताज्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले असून, आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के! एकलासपूरमध्ये ३ रिश्टर स्केलची नोंद; नागरिकांमध्ये भीती

यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के! एकलासपूरमध्ये ३ रिश्टर स्केलची नोंद; नागरिकांमध्ये भीती

यवतमाळच्या एकलासपूरमध्ये ३ रिश्टर स्केलचा भूकंप! नागरिकांमध्ये भीती, सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही.

Nov 09, 2026
दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरमध्ये आगीच्या आठ घटना; ३० जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य

दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरमध्ये आगीच्या आठ घटना; ३० जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य

लातूरमध्ये दिवाळीच्या फटाक्यांमुळे आठ ठिकाणी आग; ३० जवान आणि आठ अग्निशमन वाहनांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

Nov 09, 2026
मानोऱ्यात मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत; समाजबांधव आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

मानोऱ्यात मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत; समाजबांधव आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

मनोज जरांगे पाटील यांचे मानोरा शहरात आगमन होताच समाजबांधव आणि शेतकऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Nov 09, 2026
ठाणे जिल्ह्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी! ९ नोव्हेंबरपासून नवे निर्बंध; ८ जानेवारी २०२७ पर्यंत आदेश लागू

ठाणे जिल्ह्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी! ९ नोव्हेंबरपासून नवे निर्बंध; ८ जानेवारी २०२७ पर्यंत आदेश लागू

दिवाळीतील आगीच्या घटनांनंतर ठाणे जिल्ह्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी लागू. ९ नोव्हेंबर २०२६ ते ८ जानेवारी २०२७ पर्यंत निर्बंध कायम राहणार.

Nov 09, 2026
पुण्याची वाहतूक क्रांती! 2030 पर्यंत बनणार देशाचे मोबिलिटी हब

पुण्याची वाहतूक क्रांती! 2030 पर्यंत बनणार देशाचे मोबिलिटी हब

Pune Mobility Centre: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशात आधुनिक वाहतूक सुविधांचा विस्तार वेगाने सुरू आहे. मेट्रो, इलेक्ट्रिक बस, इनर आणि आउटर रिंग रोड, भूमिगत मार्ग, बोगदे तसेच नव्या विमानतळ

Nov 04, 2026