हिंगोली तालुक्यातील राहोली खुर्द येथील घटना
हिंगोली (Hingoli Rural Police) : तालुक्यातील राहोली खुर्द येथे वाढदिवसा निमित्त सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे डीजे लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाणे अंमलदार यांनी दिलेल्या माहिती दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता राहोली खुर्द येथील मारोती मंदिराच्या पाठीमागे एमआयडीसी कडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर ही घटना घडली.
आरोपी गोपाल विठ्ठल घरबुडवे, आशिष केशव गरड, दोघे रा. राहोली खुर्द ता.जि. हिंगोली आणि दीपक प्रल्हाद क-हाळे, रा. क-हाळे डीग्रस यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त सार्वजनिक रोडवर बकासूर डीजे क्र. MH 26 ED 0255 व देवा नावाचा डीजे क्रमांक MH 20 EL 4381 असे रोडवर लावून रहदारीस अडथळा निर्माण केला. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना जीवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे करून जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांचे मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) जमाव बंदीचे आदेश असतांना लोकांना जमवून सार्वजनिक उपद्रव केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी राहुली खुर्द येथील पोलीस पाटील स्वप्नील किसन लोनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. २९ सप्टेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार असलम गारवे करीत आहेत.