हिंगोली ग्रामीण पोलिस

सीआयडीची बतावणी करून शिक्षकाच्या काढून घेतल्या तीन सोन्याच्या अंगठ्या

Hingoli Rural Police: लाख (मेथा) येथील शिक्षकाची दुचाकी थांबवून दोन भामट्यांनी तीन लाख रुपयाच्या सोन्याच्या अंगठ्या सीआयडी असल्याची बतावणी करून लांबविल्याची घटना घडल्याने हिंगोली

सीआयडीची बतावणी करून शिक्षकाच्या काढून घेतल्या तीन सोन्याच्या अंगठ्या

Hingoli Rural Police

हिंगोली (Hingoli Rural Police) : लाख (मेथा) येथील शिक्षकाची दुचाकी थांबवून दोन भामट्यांनी तीन लाख रुपयाच्या सोन्याच्या अंगठ्या सीआयडी असल्याची बतावणी करून लांबविल्याची घटना घडल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

औंढा नागनाथ तालुक्यातील लाख (मेथा) मधोमती माध्यमिक विद्यालयातील प्रताप नाथराव पतंगे हे शिक्षक म्हणुन कार्यरत असुन हिंगोली येथून दररोज शाळेच्या वेळेनुसार ये जा करीत असतात. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४५ च्या सुमारास नेहमी प्रमाणे हिंगोलीतून मोटार सायकलवरून हिंगोली ते औंढा नागनाथ रस्त्याने लाखा मेथा येथील शाळेवर जाण्याकरीता निघाले होते. तेवढ्यात पाठीमागून एका मोटार सायकलवरील दोघांनी येऊन पतंगे यांची मोटार सायकल थांबविण्यास सांगितले असता त्यांनी रस्त्याच्या बाजूला मोटार सायकल थांबविली. याचवेळी मोटार सायकलवरील एका व्यक्तीने आम्ही सीआयडी पोलिस असुन समोर गांजा पकडलेला असल्याने काही इसम चाकुने हल्ला करीत आहेत.

त्यामुळे तुम्ही सावध रहा असे सांगुन तुमच्या खिशात काय आहे अशी विचारणा पतंगे यांच्याकडे केली असता खिशामध्ये मोबाईल व रुमाल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भामट्याने पतंगे यांच्या हातातील रुमाल घेऊन मोटार सायकलच्या सीटवर ठेवून तुमच्या खिशातील मोबाईल, पैसे व हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून यामध्ये ठेवा असे सांगितल्याने पतंगे यांनी मोबाईल सोन्याच्या तीन अंगठ्या रुमालात ठेवल्यावर भामट्यांनी रुमालाची गाठ मारून दिली. त्यानंतर पतंगे यांना जाण्याकरीता सांगितले असता ते शाळेकडे निघून गेले.

शाळेत पोहचल्यानंतर रूमालाची गाठ उघडून पाहीली असता त्यात केवळ मोबाईल दिसून आला. त्यामुळे त्यांनी हिंगोली ग्रामीण पोलिसात तक्रार देऊन तीन तोळ्याच्या तीन लाखांच्या अंगठ्या लांबविल्याचे नमुद केले. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

टैग्स: Hingoli Rural Police

संबंधित सामग्री

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
वाढदिवसाला डीजे लावणे पडले महागात; हिंगोली ग्रामीण पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल

वाढदिवसाला डीजे लावणे पडले महागात; हिंगोली ग्रामीण पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल

Hingoli Rural Police: तालुक्यातील राहोली खुर्द येथे वाढदिवसा निमित्त सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे डीजे लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा..

Sep 30, 2026
ईसापूर रमणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

ईसापूर रमणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

हिंगोलीच्या ईसापूर रमणा येथे ५० वर्षीय शेतकरी विठ्ठल वाढवे यांची आत्महत्या; नापिकी, दुष्काळ, कर्ज आणि मुलीच्या विवाहाची चिंता असल्याची माहिती.

Sep 26, 2026
हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत दोन छाप्यांत गुटखा व तंबाखूसह ३४ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका कारवाईत आरोपीला पकडले, तर दुसऱ्या कारवाईत आरोपी पसार झाले.

Sep 19, 2026
आतंकवादी फिरत असल्याचे सांगून सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला

आतंकवादी फिरत असल्याचे सांगून सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला

Hingoli Rural Police: समोर आतंकवादी फिरत  असल्याचे  सांगून त्यांच्या  जवळील सोन्याची अंगठी  काढण्यास सांगून रुमालामध्ये ठेवल्याचे भासून सोळंके यांच्या गाडीच्या डिक्कित ठेवून निघून गेले.

Aug 04, 2026