कन्हान बकऱ्या चोरी

पाच बकऱ्या चोरीला गेल्याने वयोवृद्ध कुटुंबावर उपासमारीची वेळ

Kanhan Goat thefts: अज्ञात चोरट्याने पाच बक-या चोरी करून सुमारे एक लाखा चे नुकसान होऊन वयोवृद्ध हौसालला पुंड यांच्यावर उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले असुन त्याची  परिस्थिती अत्यंत बिकट

पाच बकऱ्या चोरीला गेल्याने वयोवृद्ध कुटुंबावर उपासमारीची वेळ

Kanhan Goat thefts

 

ठाणेदार मांडवधरे यांच्या तत्पर कारवाईच्या आश्वासनाने दिलासा

कन्हान (Kanhan Goat thefts) : सुपर टॉऊन प्रभाग क्र. २ येथील रहिवासी हौसालला पुंड यांच्या बक-याच्या कोठयातुन अज्ञात चोरट्याने पाच बक-या चोरी करून सुमारे एक लाखा चे नुकसान होऊन वयोवृद्ध हौसालला पुंड यांच्यावर उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले असुन त्याची  परिस्थिती अत्यंत बिकट होऊन उपासमारीची वेळ आली आहे. 
           
मंगळवार (दि.१५) सप्टेंबर ला सुपर टॉऊन परिसरातील वयोवृद्ध हौसालला पुंड हे आपल्या पत्नी सोबत वास्तव्यास असुन त्यांचा मुलगा कळमेश्वर येथे पत्नीसमवेत राहतो. हौसालला पुंड हे बकऱ्या चारून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराजवळील कोठयातुन पाच बक ऱ्या चोरून नेल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बकऱ्या चोरीला गेल्याने वयोवृद्ध हौसाल ला पुंड यांच्यावर उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले असुन त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

या प्रकरणी सुर्यभान चकोले, संतोष दहीफळकर, संदीप पोकेळे तसेच वयोवृद्ध हौसालला पुंड यांनी समाजसेव क प्रशांत बाजीराव मसार यांच्या मदतीने कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. कन्हान ठाणेदार मंडवधरे मॅडम यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत चोरट्याचा लवकरात लवकर शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासनाचा दिलाशा देत वयोवृद्ध कुटुंबाला सबुरीचा सल्ला देण्यात आला. डीबी पथका ला घटना स्थळी पाठवुन तपास सुरू करित आरोपी चोरटयाचा कन्हान पोलीस शोध घेत आहे.

टैग्स: Goat thefts Kanhan

संबंधित सामग्री

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

Kanhan illegal coal theft: अवैध कोळसा वाहतुकी विरोधात कन्हान पोलिसांनी धडक कारवाई करित कोळशाने भरलेला संशयित ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिस रातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ

Oct 05, 2026
२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

Kanhan cattle Illegal transport: स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलि सांनी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत गौवंशांची अवैध वाहतुक करणारा टाटा चा बारा चाकी ट्रक पकडला.

Sep 30, 2026
शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू

शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू

कन्हानच्या खोपडी शिवारात ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. मुसळधार पाऊस व विजांच्या कडकडाटादरम्यान वीज पडल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता.

Sep 19, 2026
स्थागुअ पोलिसांनी कार ने गांजा तस्करी करताना पकडुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

स्थागुअ पोलिसांनी कार ने गांजा तस्करी करताना पकडुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Kanhan Ganja Smuggling: नागपुर जबलपुर महामार्गावरील टेकाडी तार कंपनी जवळ कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा ना. ग्रा. पथकाने सापळा रचुन  महेंद्रा एक्स यु व्ही कार थांबवुन पाहणी

Sep 09, 2026
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कन्हान येथे नदीघाट व नदी पात्राचे निरिक्षण 

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कन्हान येथे नदीघाट व नदी पात्राचे निरिक्षण 

Kanhan River Ghat: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाची प्रक्रिया शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी कन्हान पोलिस प्रशासन, कन्हान - पिपरी नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित विभाग

Sep 08, 2026