मॉ काली मंदीर घाटासह विसर्जन मार्गाची पाहणी
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांच्या सूचना
कन्हान (Kanhan River Ghat) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाची प्रक्रिया शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी कन्हान पोलिस प्रशासन, कन्हान - पिपरी नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडुन मॉ काली मंदीर कन्हान नदी घाट व पात्राची आणि विसर्जन मार्गाचे निरिक्षण करून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय योजनांच्या सूचना करण्यात आल्या.
गणेश मुर्ती विसर्जन स्थळ म्हणजे मॉ काली मंदीर कन्हान नदी घाट व पात्राची आणि विसर्जन मार्गाचे निरिक्षण (Kanhan River Ghat) सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिका री कन्हान विभाग शशांत गौंडा, कन्हान पोलीस निरिक्ष क वैजयंती मांडवधरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कन्हान-पिपरी नगरपरिषद मुख्याधिका री दीपक घोडके, कांद्री नगर पंचायत मुख्याधिकारी सचिन गाढवे, एमएसइबी अधिकारी श्रीवास्तव, सार्व जनिक बांधकाम विभाग अधिकारी गजानन गोतमारे, अग्निशमन दल अधिकारी व कर्मचारी तसेच जीवनरक्ष क बालचंद बोंदरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मॉ काली मंदीर कन्हान नदी घाट व पात्रातील विसर्जनस्थळी भाविकांची सुरक्षितता, वाह तुक नियंत्रण व नियोजन, विद्युत व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, रस्त्यांची स्थिती तसेच आपत्कालीन परिस्थि तीत करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिका ऱ्यांशी चर्चा करण्यात आली. (Kanhan River Ghat) विसर्जनस्थळी आवश्य क त्या सुरक्षा उपाययोजना, प्रकाश व्यवस्था, वाहतुक व्यवस्था आणि जीवनरक्षकांची उपलब्धता याबाबतही संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने प्रशासनाकडुन योग्य नियो जन करून सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे.
गणेशोत्सव नागरिकांनी शांततेत व उत्साहात साजरा करून विसर्जनाच्या दिवशी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शशांत गौंडा, पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे आणि कन्हान नगर परिष द मुख्याधिकारी दीपक घोडके यांनी केले आहे. “गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून शांतता व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे,” असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.