Lightning Strike

शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू

कन्हानच्या खोपडी शिवारात ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. मुसळधार पाऊस व विजांच्या कडकडाटादरम्यान वीज पडल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता.

शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू

Lightning Strike

मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट; खोपडी शिवारात दुर्दैवी घटना

 

कन्हान : पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा खोपडी (खेडी) येथील शेतात मजुरीच्या कामासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी शेताच्या बांधावर आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुलोचना देवरावजी ठाकरे, वय ६५ वर्षे, रा. खोपडी, असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटादरम्यान वीज पडल्याने महिलेचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुलोचना ठाकरे शुक्रवार (दि. १८ सप्टेंबर) रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान आपल्या मामी रेखाबाई लक्ष्मण वराडे, उषाबाई रामेश्वर वराडे आणि चंद्रबाई रघुनाथ वराडे यांच्यासोबत खोपडी शिवारातील शेतात मजुरीच्या कामासाठी गेल्या होत्या. संबंधित शेत हे लक्ष्मण वराडे यांनी ठेक्याने केले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. दुपारी सुलोचना घरी परतल्या नसताना सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी आकाशात जोरदार विजांचा कडकडाट सुरू होता. रात्रीपर्यंत त्या घरी न परतल्याने त्या नातेवाईकांकडे गेल्या असाव्यात, असे कुटुंबीयांना वाटले.

शनिवार (दि. १९ सप्टेंबर) रोजी सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान विकास वराडे यांनी प्रविण ठाकरे यांना फोन करून सुलोचना घरी आहेत का, अशी विचारणा केली. त्या घरी नसल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. सकाळी ७ वाजता शेजारील शेतातील बांधीत सुलोचना ठाकरे यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे मृतदेह नेण्यात आला. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी प्रवीण ठाकरे यांच्या तक्रारीवरून मर्ग क्र. ३८/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

मृत महिलेचा मृत्यू विजेचा धक्का अथवा वीज पडल्यामुळे झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश बाटबारई करीत आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

Hingoli Suicide-affected farmer: दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून इसापूर-रमणा येथील शेतकरी विठ्ठल फकीरा वाढवे यांनी चार दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

Oct 06, 2026
अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

Kanhan illegal coal theft: अवैध कोळसा वाहतुकी विरोधात कन्हान पोलिसांनी धडक कारवाई करित कोळशाने भरलेला संशयित ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिस रातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026