कोटगुल कॅसिनो जुगार

कोटगुलच्या कॅसिनो जुगारावर धाड; ३४ जण ताब्यात, दोन मुख्य आरोपी फरार!

Kotgul Casino Gambling:

कोटगुलच्या कॅसिनो जुगारावर धाड; ३४ जण ताब्यात, दोन मुख्य आरोपी फरार!

Kotgul Casino Gambling

 

१.५० कोटींचा मुद्देमाल जप्त; तीन-चार वर्षांपासून सुरू असल्याची चर्चा, बोरी-बोटेकसातही जुगार अड्ड्यांची कुजबुज

कोरची (Kotgul Casino Gambling) : गोवा-मुंबईच्या धर्तीवर पत्त्यांचा कॅसिनो स्टाइल जुगार! कोटगुल परिसरातील जंगलात सुरू असलेल्या या अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगुल पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल १ कोटी ५० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, या संपूर्ण जुगार अड्ड्याचे प्रमुख सूत्रधार मानले जाणारे परमेश्वर लोहबरे आणि मिथुन तांबेकऱे हे दोन मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसून फरार आहेत.

पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कोटगुल परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर पैसे लावून पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. घटनास्थळावरून ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले, तर रोख रक्कम, २३ चारचाकी वाहने, ५ दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तीन-चार वर्षांपासून ‘कॅसिनो’चा खेळ?

कोटगुलमध्ये सुरू असलेला हा जुगार साधासुधा पत्त्यांचा अड्डा नसून गोवा आणि मुंबईत खेळल्या जाणाऱ्या कॅसिनो पत्त्यांच्या खेळाच्या धर्तीवर मोठ्या पैशांची उलाढाल करणारा अड्डा असल्याची माहिती पुढे येत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची स्थानिक पातळीवर चर्चा आहे.

गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या (Kotgul Casino Gambling) अड्ड्यावर दररोज मोठ्या प्रमाणात जुगार खेळविला जात असून अड्डा चालविणाऱ्यांना दररोज एक ते दीड लाख रुपयांपर्यंत कमाई होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. जुगार खेळण्यासाठी बाहेरून येणाऱ्यांसाठी निवास, भोजन, दारू आणि इतर मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचीही चर्चा आहे. या माहितीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

‘बाई-बॉटली’पासून सर्व सोयी?

जुगाराच्या अड्ड्यावर येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दारू तसेच इतर सुविधा पुरवल्या जात असल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा अड्डा केवळ पत्त्यांच्या खेळापुरता मर्यादित नसून त्यामागे मोठे आर्थिक आणि व्यावसायिक नेटवर्क असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

३६ आरोपी, ३४ ताब्यात; दोन मुख्य सूत्रधार फरार

या (Kotgul Casino Gambling) प्रकरणात एकूण ३६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ३४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. मात्र परमेश्वर लोहबरे (रा. नागपूर) आणि मिथुन तांबेकऱे (रा. कोटगुल) हे दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे या दोघांच्या अटकेनंतर या जुगार अड्ड्यामागील आर्थिक व्यवहार आणि संपूर्ण नेटवर्कचा आणखी मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

बोरी-बोटेकसातही अड्डे सुरू असल्याची चर्चा

कोटगुलवर कारवाई (Kotgul Casino Gambling) झाल्यानंतर आता बोरी, बोटेकसा आणि तालुक्यातील इतर दुर्गम भागांमध्येही जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध जुगार सुरू असताना स्थानिक यंत्रणेला याची माहिती नव्हती का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

काही ठिकाणी आर्थिक कारणांमुळे स्थानिक पातळीवर जुगाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कोटगुलपुरती कारवाई न थांबवता तालुक्यातील इतर संशयित जुगार अड्ड्यांवरही धडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आता ‘त्या’ दोन फरार आरोपींच्या अटकेकडे लक्ष

कोटगुल कारवाईत ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले असले तरी दोन प्रमुख आरोपी फरार राहिल्याने पोलिसांसमोरील खरी कसोटी आता सुरू झाली आहे. या दोघांना पोलिस कधी अटक करतात आणि त्यांच्या चौकशीतून जुगार अड्ड्याचा आर्थिक व्यवहार, आयोजकांचे नेटवर्क आणि त्यांना मिळणारे संभाव्य पाठबळ किती मोठे आहे, हे समोर येणार आहे. कोटगुलच्या जंगलात लाखोंचा जुगार, कोट्यवधींच्या मुद्देमालाचा धक्का आणि दोन मुख्य आरोपी फरार—या कारवाईने कोरची तालुक्यातील अवैध जुगाराच्या साम्राज्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

संबंधित सामग्री

गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

Giramwadi Gambling Raid: तालुक्यातील गिरामवाडी शिवारात सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर १ सप्टेंबरला पोलिसांनी छापा मारून १ लाख ७ हजार ६४० रुपयाचा मुद्देमाल जप्त

Sep 01, 2026
झन्ना-मन्ना जुगारावर छापा; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

झन्ना-मन्ना जुगारावर छापा; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

तालुक्यातील वाकोडी शिवारात झन्ना-मन्ना जुगारावर पोलिसांनी छापा मारून पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, १ लाख २ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Aug 22, 2026
परभणीत ‘तिर्रट’ जुगारावर छापा; ६ दुचाकी, ३ मोबाईलसह ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

परभणीत ‘तिर्रट’ जुगारावर छापा; ६ दुचाकी, ३ मोबाईलसह ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणीसावरगाव येथे ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.

Aug 22, 2026
अवैध धंद्याची माहिती दडविल्याने बळसोंडच्या पोलिस पाटील महिलेवर निलंबनाची कारवाई

अवैध धंद्याची माहिती दडविल्याने बळसोंडच्या पोलिस पाटील महिलेवर निलंबनाची कारवाई

Police Patil Suspension: अकोला बायपास ते गारमाळ जाणार्‍या रस्त्यालगत पोलिसांनी टाईम बाजार मटका जुगारावर छापा मारला होता. कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू असल्यास त्याची माहिती पोलिस..

Aug 19, 2026
हिंगोलीत आयजींच्या दौर्‍यामुळे पोलिसांचे छापे; २६ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल

हिंगोलीत आयजींच्या दौर्‍यामुळे पोलिसांचे छापे; २६ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल

Hingoli Police Raids: नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे आज २० ऑगस्टला हिंगोलीत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये गुन्हे आढावा व जनसंवाद बैठक त्यानंतर कळमनुरी पोलिस..

Aug 19, 2026