Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Gambling Raid

झन्ना-मन्ना जुगारावर छापा; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

तालुक्यातील वाकोडी शिवारात झन्ना-मन्ना जुगारावर पोलिसांनी छापा मारून पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, १ लाख २ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


झन्ना-मन्ना जुगारावर छापा पाच जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

Gambling Raid |

कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील घटना

कळमनुरी : तालुक्यातील वाकोडी शिवारात झन्ना-मन्ना जुगारावर पोलिसांनी छापा मारून पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, १ लाख २ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

२१ ऑगस्ट रोजी वाकोडी गावाबाहेर गजानन अंभोरे यांच्या शेतालगत झन्ना-मन्ना जुगार सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयुर रसाळ यांना मिळाल्याने त्यांनी पथकाला घटनास्थळी रवाना केले.

मारलेल्या छाप्यात चार मोबाईलसह एक मोटारसायकल व नगदी रक्कम असा एकूण १ लाख २ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कळमनुरी पोलीस ठाण्यात पोउपनि मदन गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेषराव पोमाजी धोस, गणेश शामराव खांबाळकर, माधव भीमराव पोटफाडे, श्रीचरण रमेशराव ढोले, सुनील तानाजी सोनुलकर, सर्व रा. वाकोडी, ता. कळमनुरी, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास पोउपनि मदन गव्हाणे हे करीत आहेत.

Related to this topic: