कन्हान पोलीस कारवाई

एकाच रात्री दोन दुकानाचे शटर फोडणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

Kanhan Police Action: कन्हानमध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी दोन दुकानांचे शटर फोडून चोरी केली. पोलीसांनी रात्री पेट्रोलिंगदरम्यान त्यांना अटक केली आणि मुद्देमाल जप्त केला.

एकाच रात्री दोन दुकानाचे शटर फोडणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

Kanhan Police Action

४ गुन्हे उघड, दोन दुचाकी वाहना सह ८४,१४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

कन्हान (Kanhan Police Action) : शहराच्या महामार्गावरील डोणेकर सभागृह जवळील विजय कॉम्प्लेक्स मध्ये सलग दोन दुकानाचे शटर फोडणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकास कन्हान पोलीसांनी पकडले. कारवाई दरम्यान एकुण ४ गुन्हे उघडकीस आणुन दोन दुचाकी वाहना सह ८४,१४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

माहितीनुसार, फिर्यादी अंकीत विजय कालरा वय ३८ वर्ष रा. जवाहर नगर स्टेट बँकचे मागे (Kanhan Police Action) कन्हान यांनी रिपोर्ट दिली की, विजय कॉम्प्लेक्स अँक्सीस एटीएम चे बाजुला अशोक नगर कन्हान येथे दुध डेअरीची दुकान आणि दुकानाचे बाजुला ७ नंबर चे दुकान सिरील पॉल ची फिशपॉट या दोन दुकानाचे शटर वाकवुन अज्ञान चोरट्यांनी दोन्ही दुकानातुन एकुण ८७५०/- रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. अश्या फिर्यादीच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३०३(२), ३३१(४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा. हर्ष ए. पोद्दार,  अप्पर पोलीस अधिक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्ग दर्शनात कन्हान पोलीस तपास करीत असतांना पहाटे ४ वाजता कन्हान पोली सांना रात्री पेट्रोलींग दरम्यान आंबेडकर चौक येथे दोन विधीसंघर्षग्रस्त बालक हे संशयित रित्या फिरतांना मिळुन आले.

विधीसंघर्षग्रस्त बालक यांना विश्वासात घेवुन त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करीत गुन्ह्या संबंधाने विचारपुस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत घरफोडी व नागपुर शहर पोलीस स्टेशन कोराडी, गिट्टीखदान, कपिल नगर परिसरात घरफोडी तसेच मोटर सायकल चोरी केल्याचे कबुल केले. पोली सांनी दोन्ही बालकांना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन दोन वेगवेगळ्या कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल किंमत २०,००० रुपये, २ मोटरसायकल किंमत ५०,००० रू.  एक पेन ड्राईव्ह किंमत ३५० रू. एक कॅनरा बँक चेक किंमत ७०,००० रूपये ने भरलेला, एक अँमेरॉन बॅटरी वारंटी कार्ड, रोख रक्कम १३,७९५ रूपये असा एकुण ८४,१४५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई (Kanhan Police Action) नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.हर्ष ए.पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, पोउपनि एकनाथ राठोड, पोहवा हरिष सोनभद्रे, अमित यादव, पोशि आकाश सिरसाट, पवन भेडारकर, चापोशि वैजनाथ तौडेवार, आशिष बोरकर, राहुल जाधव सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.

संबंधित सामग्री

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

Kanhan illegal coal theft: अवैध कोळसा वाहतुकी विरोधात कन्हान पोलिसांनी धडक कारवाई करित कोळशाने भरलेला संशयित ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिस रातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ

Oct 05, 2026
२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

Kanhan cattle Illegal transport: स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलि सांनी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत गौवंशांची अवैध वाहतुक करणारा टाटा चा बारा चाकी ट्रक पकडला.

Sep 30, 2026
शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू

शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू

कन्हानच्या खोपडी शिवारात ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. मुसळधार पाऊस व विजांच्या कडकडाटादरम्यान वीज पडल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता.

Sep 19, 2026
पाच बकऱ्या चोरीला गेल्याने वयोवृद्ध कुटुंबावर उपासमारीची वेळ

पाच बकऱ्या चोरीला गेल्याने वयोवृद्ध कुटुंबावर उपासमारीची वेळ

Kanhan Goat thefts: अज्ञात चोरट्याने पाच बक-या चोरी करून सुमारे एक लाखा चे नुकसान होऊन वयोवृद्ध हौसालला पुंड यांच्यावर उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले असुन त्याची  परिस्थिती अत्यंत बिकट

Sep 15, 2026
स्थागुअ पोलिसांनी कार ने गांजा तस्करी करताना पकडुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

स्थागुअ पोलिसांनी कार ने गांजा तस्करी करताना पकडुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Kanhan Ganja Smuggling: नागपुर जबलपुर महामार्गावरील टेकाडी तार कंपनी जवळ कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा ना. ग्रा. पथकाने सापळा रचुन  महेंद्रा एक्स यु व्ही कार थांबवुन पाहणी

Sep 09, 2026