कन्हान (Rakesh Suryavanshi) : कामधंदा मिळत नसल्यामुळे राकेश सुर्य वंशी या युवकाने बेरोजगारी च्या मानसिक त्रासा ला कंटाळुन बोरडा रोड कडील रामटेक रेल्वे लाईन वर रात्री रेल्वेने कटुन आत्महत्या केल्याची घटना सामोर आली आहे.
देविदीन शिवपाल सुर्यवंशी वय ५५ वर्ष राह. सुखदेवे कॉलोनी, जे.एन. हॉस्पीटल जवळ वार्ड क्र.४ कांद्री यांचा मुलगा राकेश देविदीन सुर्यवंशी वय २८ वर्ष हा बेरोजगारीमुळे कुठलाही कामधंदा मिळत नस ल्याने रिकामा इकडे-तिकडे कामाच्या शोधात फिरत असल्याने मानसिक तणावात राहत होता. गुरूवार (दि .२६) ला रात्री ला राकेश हा जेवन करून घरा जवळी ल मंदीरात बसला होता. परंतु रात्री १० वाजता तेथुन तो निघुन गेला.
फिर्यादी मनोज सुर्यवंशी घरी झोपले असताना रात्री १२.१० वाजता म्हणजे शुक्रवार (दि. २७ ) मध्यरात्री त्याचा पुतण्या रितेष राममनोहर सुर्य वंशी याने फोन करून सांगितले की, राकेश सुर्यवंशी हा जे.एन. हॉस्पिटल सामोर शक्ती नगर कांद्री बोरडा जाणा-या रस्त्या वरील रामटेक रेल्वे लाईनवर रेल्वेने कटुन मृत्यु झाला आहे. असे माहित होताच काका मनोज सुर्यवंशी यांनी घटनास्थळी जावुन पाहिले तर राकेशचे डोके रेल्वे रूळा मध्ये तर रूळा बाहेर त्याचे शरीर पडले दिसले. यावरून राकेश ने बेरोजगारी ला कंटाळुन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
घटनास्थळी कन्हान पोलीसानी पोहचुन पंचनामा करून मृतदेह शवविच्छे दना करिता उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे पाठविला. फिर्यादी काका मनोज शिवपाल सुर्यवंशी वय ३८ वर्ष राह. सुखदेवे कॉलोनी, जे.एन. हॉस्पिटल जवळ वार्ड क्र ४ कांद्री (Rakesh Suryavanshi) मृतकाचा काका याचा तोडी बयाणा वरून कन्हान पोलीसानी मर्ग चा गुन्हा नोंद करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
रेल्वे रूळावर कटुन राकेश सुर्यवंशीची आत्महत्या
Rakesh Suryavanshi: राकेश सुर्यवंशी, एक २८ वर्षीय युवक, जो काम न मिळाल्यामुळे मानसिक त्रासात होता, त्याने रेल्वे लाईनवर रेल्वेखाली आत्महत्या केली.
Rakesh Suryavanshi
संबंधित सामग्री
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी
Hingoli Suicide-affected farmer: दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून इसापूर-रमणा येथील शेतकरी विठ्ठल फकीरा वाढवे यांनी चार दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्याची आत्महत्या
Parda Farmer suicide: तालुक्यातील पारडा येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्यावर बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे त्याने चिंतेत राहून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना
नोएडाच्या सुपरनोव्हा सोसायटीत धक्कादायक घटना; ४३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या
नोएडाच्या सेक्टर-९४ येथील सुपरनोव्हा सोसायटीत गुरुग्रामच्या संभव जैन या तरुणाने ४३व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांचा तपास सुरू आहे.
पाऊस लांबला, विहिरी आटल्या, जनावरे दगावली आणि कर्जाचा भार वाढला!
Drought-Affected Farmers Suicides: आटलेल्या विहिरी, पशुधनाचे नुकसान आणि वाढता कर्जाचा भार अशा संकटांचा सामना करताना सोलापूर जिल्ह्यातील 18 वर्षीय तरुण शेतकरी प्रथमेश अनिल खरात याने आत्महत्या
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.