अकोल्यातील लैंगिक अत्याचाराची घटना

अकोला हादरले; सहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार!

अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत पंधरा वर्षीय बालकाने सहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अकोला हादरले; सहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार!

अकोला : शहरातील सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन हद्दीतील एका पंधरा वर्षीय विधी संघर्ष बालकाने सहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी शनिवार, ९ मे रोजी उशिरा रात्री पोक्सोसह विविध कलमांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, १२ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी कामावरून घरी परतल्यानंतर त्यांच्या सहा वर्षीय चिमुकलीने रडत रडत आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली. घराशेजारी राहणाऱ्या त्यांच्याच नात्यातील संबंधित व्यक्तीच्या मुलाने, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दुपारी २ वाजताच्या सुमारास हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही घटना ऐकून कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्याकडे धाव घेतली होती; मात्र चिमुकलीची प्रकृती अस्वस्थ असल्याने तक्रार नोंदविण्यात आली नव्हती. त्यानंतर सीसीटीएनएस प्रणालीमध्ये नोंद करण्यात आली होती. काही दिवसांनी फिर्यादींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी चिमुकलीसह पोलीस ठाण्यात हजर राहून अधिकृत तक्रार दिली.
या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात अप. क्र. ४५७/२०२६ नुसार कलम ६४(फ) भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ३, ४, ५(एम)(एन), ६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तपासादरम्यान संबंधित विधी संघर्षित बालकास त्याच्या पालकांसह पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तनुजा खोब्रागडे, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक मालती कायटे यांनी दिली आहे.

वैद्यकीय तपासणी अहवालानंतर कारवाई
पीडित चिमुकलीची व विधी संघर्षित बालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

विधी संघर्ष बालकास रिमांड होममध्ये ठेवण्याची तयारी!
दरम्यान, विधी संघर्षित बालकास रिमांड होममध्ये पाठविण्याची तयारी पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती आहे.

सदर घटनेप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून विधी संघर्ष बालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करण्यात येत असून, बाल न्याय मंडळाचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.
- अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला

विधी संघर्ष बालकाला घेतले ताब्यात!
सदर घटनेप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

पीडित चिमुकलीच्या आईची पोलीस अधीक्षकांकडे धाव!
या घटनेप्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन पोलीस निरीक्षक मालती कायटे यांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हे दाखल केले.

घटनेला वादाची किनार?
विधी संघर्ष बालकाने त्याच्याच नात्यातील सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेला दोन्ही कुटुंबातील वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी गुन्हादेखील नोंद केल्याची माहिती आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

Latur Sexual Assault Case: नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे

Oct 02, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026
‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

दिल्ली-NCRमधील लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाची सुओ मोटू दखल; सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेवर दिल्ली पोलिसांना सवाल.

Sep 28, 2026