औंढा नागनाथ (Aundha illegal Gutkha Action) : येथील खतीब कॉलनी भागात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या अवैध गुटखा साठ्यावर औंढा नागनाथ पोलिसांनी ५ ऑक्टोबर सोमवार रोजी कारवाई करून ४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून खतीब कॉलनी भागात आरएमडी, विमल पान मसाला, गोवा गुटखा असा अवैध साठा असल्याचे निदर्शनास आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, रोहिदास राठोड, शाहेद सय्यद, रमेश मस्के, ओंकारेश्वर रांजणेकर, जयदीप जाधव, गजानन गडदे, राजकुमार कुटे, तानाजी ढाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या (Aundha illegal Gutkha Action) गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याप्रकरणी वहाबोद्दिन खतीब रा. औंढा ना. याच्यावर अन्न व औषध प्रशासन मार्फत गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
औंढ्यात अवैध गुटखा साठ्यावर पोलिसांची कारवाई; ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त
Aundha illegal Gutkha Action:येथील खतीब कॉलनी भागात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या अवैध गुटखा साठ्यावर औंढा नागनाथ पोलिसांनी ५ ऑक्टोबर सोमवार रोजी कारवाई करून ४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल
Aundha illegal Gutkha Action
संबंधित सामग्री
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के
हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद
Aundha Nagnath Temple closed: औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या परिसरातील आतील गर्भगृहातील दुरुस्तीचे काम सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गोळेगाव येथील जामियातुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 22 लाखांचा अपहार; चार जणांवर गुन्हा
गोळेगाव येथील जामियातुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 22 लाख 16 हजार रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी चार पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादीस औंढा नागनाथ पोलिसांनी केला परत
Aundha Nagnath Theft Case: पोलीस ठाणे हद्दीतील पेरजाबाद शिवारातील नदीपात्रातून शेतकरी सुदाम मुंजाळ यांचा चोरट्याने दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी पाण्यातील पाच एचपी विद्युत मोटार पंप चोरून नेला होता.