Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > करीअर

सैनिक आयुष बावनकुळे

आयुष बावनकुळे यांची भारतीय सैन्यात गौरवशाली निवड

Sainik Ayush Bawankule: कांद्री येथील समाजसेवक विशाल चाफले यांचे भाचे आयुष सुरेश बावनकुळे या होतकरू तरुणा ची अवघ्या २१ व्या वर्षी भारतीय सैन्यात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊन


आयुष बावनकुळे यांची भारतीय सैन्यात गौरवशाली निवड

Ayush Bawankule |

कन्हान - कांद्री शहर विकास मंच व्दारे आयुष बावनकुळे चा सत्कार

कन्हान (Sainik Ayush Bawankule) : कांद्री येथील समाजसेवक विशाल चाफले यांचे भाचे आयुष सुरेश बावनकुळे या होतकरू तरुणा ची अवघ्या २१ व्या वर्षी भारतीय सैन्यात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊन आयुष बावनकुळेच्या उल्लेखनीय यशाबद्दल कन्हान-कांद्री शहर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आयुष बावनकुळे (Ayush Bawankule) यांनी लहानपणा पासुनच शिक्षणासाठी आपल्या मामांकडे, विशाल चाफले यांच्याकडे कांद्री येथे वास्तव्यास राहुन शिक्षण पूर्ण केले. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगुन त्यांनी नगरधन येथील अकादमीत सैन्य भरतीचे कठोर प्रशिक्षण घेतले. सन २०२४ मधिल सैन्य भरती प्रक्रियेत त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र अपयशाने खचुन न जाता त्यांने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर पुन्हा तयारी सुरू ठेवली. अखेर सन २०२५ मधिल भरती प्रक्रियेत सहभाग घेत संपुर्ण निवड प्रक्रि येत यश संपादन करित भारतीय सैन्य दलात स्थान मिळविले.

आयुषच्या (Ayush Bawankule) यशामुळे कांद्री, कन्हान तसेच संपुर्ण परिसराचा गौरव वाढला असुन युवकांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाल्याने कन्हान-कांद्री शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनक र यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष बावनकुळे यांचा सत्कार करून त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कन्हान - कांद्री शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, सुनिता मानकर, सुषमा मस्के, शुभम बावनकर, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, निखिल तांडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, सदस्य व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.