Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > करीअर

NEET रिद्धी वसू

​कोटा-लातूरला न जाता कुमारी रिद्धी वसूची 'नीट' परीक्षेत उत्तुंग झेप; ७२० पैकी मिळवले ६३३ गुण!

NEET Riddhi Vasu: मोठ्या शहरात वा नामांकित निवासी कोचिंग हबमध्ये न जाता, केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर चिखली येथील कुमारी रिद्धी लता अजाबराव वसू हिने घरूनच अभ्यास 'नीट' परीक्षेत घवघवीत यश संपादन


​कोटा-लातूरला न जाता कुमारी रिद्धी वसूची नीट परीक्षेत उत्तुंग झेप ७२० पैकी मिळवले ६३३ गुण

NEET Riddhi Vasu |


​चिखली-बुलढाणा अपडाऊन करत मिळवले दैदिप्यमान यश;
रिद्धीवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

चिखली (NEET Riddhi Vasu) : मेडिकल फॅकल्टीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आजकाल ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी घर सोडून कोटा, लातूर, नांदेड यांसारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन वर्षानुवर्षे परीक्षेची तयारी करतात. मात्र, कोणत्याही मोठ्या शहरात वा नामांकित निवासी कोचिंग हबमध्ये न जाता, केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर चिखली येथील कुमारी रिद्धी लता अजाबराव वसू हिने घरूनच अभ्यास करत 'नीट' (NEET UG) परीक्षेत ७२० पैकी तब्बल ६३३ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

​चिखली येथील नामांकित डॉक्टर अजाबराव वसू यांची सुकन्या कुमारी रिद्धी वसू (NEET Riddhi Vasu) ही बुलढाणा अर्बनच्या बुलडाणा येथील शाळेमध्ये आपले शिक्षण घेत होती. नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी सहसा लाखो रुपयांचा खर्च करून विद्यार्थी परराज्यात किंवा मोठ्या शहरांत धाव घेतात. परंतु, रिद्धीने बाहेरगावी न जाता बुलढाणा कॉलेजमध्येच असलेल्या खाजगी क्लासचा उपयोग घेतला आणि चिखली ते बुलढाणा असा दैनंदिन प्रवास (अपडाऊन) करून अत्यंत मेहनतीने हे क्लासेस पूर्ण केले. घरची शिस्त आणि प्रवासाचा थकवा या दोन्ही गोष्टींवर मात करत तिने अभ्यासात आपले सातत्य टिकवून ठेवले. नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात तिने ६३३ गुणांसह जनरल कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक (AIR) ३११२ मिळवून चिखलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


गुणपत्रिकेतील महत्त्वपूर्ण कामगिरी:

केमिस्ट्री (Chemistry): ९९.८६ पर्सेंटाईल
फिजिक्स (Physics): ९९.७५ पर्सेंटाईल
बायोलोजी (Biology): ९७.८६ पर्सेंटाईल
​एकूण गुण: ६३३ / ७२०

ऑल इंडिया रँक: ३११२ (कॅटेगरी रँक: १५५५)

​दरवर्षी देशभरातून लाखो विद्यार्थी या कठीण परीक्षेला सामोरे जातात. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत मोठ्या शहरात न जाता, स्थानिक पातळीवर क्लास लावून आणि दररोज अपडाऊन करून रिद्धीने मिळवलेले हे यश खरोखरच वाखाणण्याजोगे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे आई-वडील, शिक्षक, नातेवाईक तसेच चिखली परिसरातील सर्व स्तरातून तचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. तिच्या पुढील वैद्यकीय प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा! 

Related to this topic: