NEET Exam Cancelled: परभणीत ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपर फुटीच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आली; ४ हजार १९८ विद्यार्थ्यांची परीक्षा प्रभावित.
नवीन तारीख नंतर जाहीर होणार; ४ हजार १९८ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
परभणी (NEET Exam Cancelled) : राष्ट्रीय चाचणी संस्थेने ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द केली आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे एनटीएने म्हटले आहे. एनटीए ने सांगितले की, नीट यूजी परीक्षा संदर्भात रविवार १० मे रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. आता या संस्थेने पालक आणि जनतेला काही नवीन निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. पूर्वीची परीक्षा केंद्रे तीच राहतील. पुनरपरीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्रे जारी केले जातील.
याशिवाय विद्यार्थ्यांचे शुल्क परत केले जाईल. परीक्षा निष्पक्ष आणि सुरक्षित करता यावी, यासाठी या (NEET Exam Cancelled) प्रकरणाशी संबंधित काही तपास ८ मे रोजी केंद्रीय यंत्रणाकडे देण्यात आले होते. आता तपास यंत्रणा कडून मिळालेल्या माहितीच्या आणि शासकीय मंजुरीच्या आधारे, एनटीएने ३मे रोजी झालेली नीट युजी परीक्षा रद्द करून तिचे पुनर्नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील.
तपास यंत्रणाच्या निष्कर्षानुसार, सध्याची तपास प्रक्रिया पुढे चालू ठेवता येणार नाही असे निश्चित झाले आहे. त्यामुळे पारदर्शकता राखण्यासाठी तपास पुन्हा करण्यात येईल. नीट युजी परीक्षा ३ मे रोजी देशभरात घेण्यात आली. (NEET Exam Cancelled) परीक्षेची प्रश्नपत्रिका वेळेपूर्वीच फुटल्याचा संशय आहे. यात परभणी शहरातील ४ हजार १९८ विद्यार्थ्यांनी ११ परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली होती.