सेलुतील दोन, मध्य प्रदेशातील एका गुन्ह्याची उकल; दिड लाखाचा मुद्देमाल जप्त
सेलू (Parbhani Grain Theft) : धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. सेलुतील दोन व मध्यप्रदेशातील एक असे तीन गुन्हे निष्पन्न झाले असून १ लाख ४९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सेलू पोलीस ठाणे हद्दित शेतकर्यांचे धान्य चोरीस गेल्याचा गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा परभणीच्या पथकाने सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे २४ तासात आरोपीची ओळख निष्पन्न करत एकाला ताब्यात घेतले. संबंधिताची चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी कडून गुन्ह्यात चोरी केलेला शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चौकशीत एकूण तीन गुन्हे उघड झाले आहेत. (Parbhani Grain Theft) तपासात दरम्यान आरोपी जवळून हळदीचे दहा कट्टे, तुरीचे आठ कट्टे आणि एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली. पोलिसांनी सागर सुंदर काळे याला पकडले असून ज्ञानेश्वर शंकर पवार, करण शाम पवार हे दोघेजण फरार आहेत. सदरची कारवाई स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात पोउपनि. गणेश सवंडकर, पोलीस अंमलदर बुधवंत, सातपुते, तुपसुंदर, उमेश चव्हाण, हनवते, सपकाळ यांच्या पथकाने केली.