शिष्यवृत्ती परीक्षा

१३६१ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा; ८३ विद्यार्थी गैरहजर

Scholarship Examination: मानोरा येथील शिष्यवृत्ती परीक्षेत १३६१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर ८३ विद्यार्थी गैरहजर राहिले. परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थापन

१३६१ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा; ८३ विद्यार्थी गैरहजर

Scholarship Examination

मानोरा (Scholarship Examination) : शिक्षण विभाग (प्रा.) जिल्हा परिषद वाशिम, पंचायत समिती मानोरा अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी पेपर साठीची परीक्षा दि. २६ एप्रिल रोजी घेण्यात आली. या परीक्षेसाठी तालुक्यातील १२ परीक्षा केंद्रावरून १३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ८३ विद्यार्थी गैरहजर राहिले. (Scholarship Examination) इयत्ता ४ थीच्या परीक्षेसाठी मानोरा पंचायत समिती क्षेत्रात ८ परीक्षा केंद्रांवर एकूण ९१३ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी ८६५ विद्यार्थी उपस्थित राहिले तर ४८ विद्यार्थी गैरहजर राहिले. सर्वाधिक १७२ विद्यार्थी लोकहित मराठी शाळा, मानोरा केंद्रावर नोंदणीकृत होते. ज्यापैकी १५३ विद्यार्थी उपस्थित राहिले. के.एल.देशमुख माध्यमिक विद्यालय, कारखेडा केंद्रावर ८६ पैकी ८६ विद्यार्थी उपस्थित राहून १०० टक्के उपस्थिती नोंदवली गेली.

 तर इयत्ता ७ वीच्या परीक्षेसाठी ४ परीक्षा केंद्रांवर ५३१ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी ४९६ विद्यार्थी उपस्थित राहिले तर ३५ विद्यार्थी गैरहजर राहिले. राष्ट्र्माता कन्या विद्यालय, मानोरा केंद्रावर सर्वाधिक १६ विद्यार्थी नोंदणीकृत असून १५६ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. एकूण दोन्ही इयत्तांसाठी १४४४ विद्यार्थ्यांपैकी १३६१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. (Scholarship Examination) परीक्षेचे काम शांततेत आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडले, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल पवार पंचायत समिती मानोरा यांनी दिली. लोकहित मराठी शाळेत त्यांनी पाहणी केली असता केंद्र प्रमुख सुधीर काळे, मुख्याध्यापक एस एस मनवर आदीसह त्यांची टीम उपस्थित होती. 

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026