Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > करीअर

हिंगोली पोलिस भरती

हिंगोलीत पोलिस शिपाई पदाकरीता होणार २९ मार्चला लेखी परीक्षा; ४११ उमेदवार पात्र

Hingoli Police Recruitment: हिंगोलीत पोलिस दल भरती प्रक्रिया सुरु; २९ मार्च रोजी लेखी परीक्षा. उमेदवारांना सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचा आदेश.


हिंगोलीत पोलिस शिपाई पदाकरीता होणार २९ मार्चला लेखी परीक्षा ४११ उमेदवार पात्र

Hingoli Police Recruitment |

उमेदवारांनी वेळेत हजर राहणे आवश्यक

हिंगोली (Hingoli Police Recruitment) : जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठी ११ फेबु्रवारी पासुन भरतीची प्रक्रीया राबविण्यात आली. सर्वसाधारण पोलिस शिपाई पदाकरीता २९ मार्चला हिंगोलीतील आदर्श महाविद्यालयात पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. 

हिंगोली शहरातील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर ११ फेबु्रवारीपासुन (Hingoli Police Recruitment) जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांकरीता भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये इच्छुक उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी उमेदवारांना चक्क पहाटे ४ वाजता मैदानावर प्रवेश दिला. यासाठी अधिकारी व कर्मचारीही सज्ज ठेवण्यात आले होते. मैदानावरील प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण पोलिस शिपाई पदाकरीता २९ मार्च रोजी घेण्यात येणार्‍या लेखी परीक्षा करीता ४११ उमेदवार पात्र ठरले आहेत.

हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालयावर सकाळी ११ ते दुपारी १२.३० दरम्यान लेखी परीक्षा (Hingoli Police Recruitment) घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे सूचना दिल्या आहेत. तसेच उमेदवारांना प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कोणतेही प्रतिबंधक केलेले साहित्य ज्यामध्ये इलेक्टॅनिक साहित्य, वॉच, हेडफोन, मोबाईल इतर प्रतिबंध साहित्य सोबत बाळगू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी केले आहे.

Related to this topic: