Hingoli Police Recruitment Exam: हिंगोली जिल्हात पोलिस चालक शिपाई पदाची लेखी परीक्षा ५ एप्रिलला होणार, ६२५ उमेदवार पात्र ठरले.
लेखी परीक्षेसाठी 625 उमेदवार पात्र
हिंगोली (Hingoli Police Recruitment Exam) : जिल्हा पोलिस दलातील पोलिस चालक शिपाई पदाकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची ५ एप्रिलला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. हिंगोली जिल्हा पोलिस दलातील रिक्त पोलिस शिपाई व चालक पदासाठी ११ फेबु्रवारी पासुन भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या टप्यात रामलिला मैदानावर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी तसेच शारिरीक चाचणी घेण्यात आली. या सोबतच चालक पदासाठी असलेल्या व पात्र ठरलेल्या उमेदवारांची वाहन चालविण्याचे कौशल्य चाचणी घेण्यात आली.
यामध्ये ६२५ उमेदवार पात्र ठरले आहेत. चालक पोलिस शिपाई - २०२४ - २५ दरम्यान वाहन चालविण्याची कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची (Hingoli Police Recruitment Exam) जिल्हा पोलिस दलाच्या संकेतस्थळावर यादी प्रसिध्द करण्यात आली. या निमित्त ५ एप्रिल रोजी हिंगोलीतील आदर्श महाविद्यालयावर सकाळी ११ वाजता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या करीता पात्र उमेदवारांनी सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी परीक्षा करीता येताना त्यांचे ऑनलाईन प्रवेश पत्र, मैदानी चाचणीच्या वेळी देण्यात आलेले ओळखपत्र व दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी केले आहे.