Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > करीअर

हिंगोली कॉपीमुक्त परीक्षा

हिंगोलीत दहावी-बारावी पुरवणी परीक्षेस प्रारंभ, पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षा

Hingoli Copy-free Examination दहावी व बारावीच्या पुर्वणी परिक्षेस हिंगोलीत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी कापीमुक्त वातावरणात शिकले गेले. जिल्ह्यातील सहा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद


हिंगोलीत दहावी-बारावी पुरवणी परीक्षेस प्रारंभ पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षा

Hingoli Copy-free Examination |

हिंगोली (Hingoli Copy-free Examination) : दि. 16 जून 2026 पासून जिल्ह्यात इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेस सुरुवात झाली. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पडली. जिल्ह्यात एकही कॉपी प्रकरण आढळून आले नाही. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी जिल्ह्यात 5 परीक्षा केंद्रांवर 983 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. आज प्रथम भाषा मराठी या विषयाच्या पेपरला 5 केंद्रांवर 363 विद्यार्थ्यांपैकी 319 विद्यार्थी उपस्थित होते, तर 44 विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

बारावीच्या परीक्षेसाठी 3 परीक्षा केंद्रांवर 1544 विद्यार्थी प्रविष्ट असून आज इंग्रजी विषयाच्या पेपरला 1329 विद्यार्थ्यांपैकी 1250 विद्यार्थी उपस्थित राहिले. 79 विद्यार्थी अनुपस्थित होते.
कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले होते. यासोबतच (Hingoli Copy-free Examination) दहावी व बारावीसाठी जिल्ह्यात 2 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्य विषयांच्या पेपरसाठी वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांचे स्वतंत्र भरारी पथकही स्थापन करण्यात आले आहे. 

पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या कडक नियोजनामुळे परीक्षा शांततेत पार पडल्याने शिक्षण विभागाने समाधान व्यक्त केले आहे. ही माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, हिंगोली यांनी दिली.