Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > करीअर

११ वी ऑनलाईन प्रवेश

इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेशाची दुसरी नियमित फेरी ६ जूनपासून सुरू

11th Online Admission: महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता ११ वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी नियमित फेरी शुक्रवार, ६ जून २०२६ पासून सुरू करण्याची घो


इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेशाची दुसरी नियमित फेरी ६ जूनपासून सुरू

11th Online Admission |

हिंगोली (11th Online Admission) : महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता ११ वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी नियमित फेरी शुक्रवार, ६ जून २०२६ पासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ४ जून २०२६ रोजी पुणे येथून जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. राज्यातील एकूण ९५९४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या फेरीसाठी आतापर्यंत एकूण १२,५१,२५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ४,५१,०५२ विद्यार्थ्यांनी ३ जून २०२६ पर्यंत आपले प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयात निश्चित केले आहेत. 

दुसऱ्या नियमित फेरीसाठी विद्यार्थ्यांना ६ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते ९ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्जाचा भाग-१ मध्ये दुरुस्ती करणे, नवीन नोंदणी करणे, पसंतीक्रमाचा भाग-२ भरणे आणि किमान १ ते कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. अर्ज लॉक करणे बंधनकारक असून, लॉक न केलेले अर्ज प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. 

या फेरीसोबतच व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत प्रवेश कोटा आणि अल्पसंख्याक कोट्यासाठीची प्रवेश प्रक्रिया देखील राबविली जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी कोट्यासाठी पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आणि लॉक करणे आवश्यक आहे. 

प्रवेशाचे अलॉटमेंट १० जून ते १२ जून २०२६ या कालावधीत होईल. कॅप फेरी-२ ची गुणवत्ता यादी (11th Online Admission) आणि कट-ऑफ यादी १३ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे देखील याबाबत माहिती कळविण्यात येईल. वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना १४ जून रोजी दुपारी १२ ते १६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा लागेल. 

शिक्षण संचालनालयाने विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी या वेळापत्रकाची नोंद घेऊन कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे. प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. तसेच शंका निरसनासाठी support@mahafyjcadmissions.in या ई-मेल आयडीवर किंवा ८५३०९५५५६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.