बासंबा पोलिस ठाणे

पोलिस कर्मचार्‍याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल

Basamba Police Station: यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी अरविंद पवार यांच्या मोटार सायकलला दुसऱ्या मोटार सायकलने धडक देऊन त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस कर्मचार्‍याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल

Basamba Police Station

यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्यामधील मयत कर्मचारी 
बासंबा पोलिस ठाणे हद्दित अपघात

हिंगोली (Basamba Police Station) : यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्यामधील पोलिस कर्मचारी मोटार सायकलवरून जात असताना बासंबा पोलिस ठाणे हद्दितील धानापूर फाट्यावर २२ मार्चला अपघाताची घटना घडली होती. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोटार सायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अरविंद भिमराव पवार (३७) हे यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. २२ मार्च रोजी मोटार सायकल क्रमांक एमएच २९ बीटी २७७८ यावरून जात असताना (Basamba Police Station) बासंबा पोलिस ठाणे हद्दितील धानापूर फाट्यावर कोंडबाराव गडदे यांच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावरून मोटार सायकल जात असताना भरधाव वेगातील मोटार सायकल क्रमांक एमएच ३८ एसी ३१६६ च्या चालकाने आपले वाहन निष्काळजीने चालवून अरविंद पवार यांच्या मोटार सायकलला धडक दिल्याने ते रस्त्याच्या खाली नालितील दगडावर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी (Basamba Police Station) बासंबा पोलिस ठाण्यात हिंगोली जिल्हा पोलिस मुख्यालयातील महिला पोलिस शिपाई अल्का चव्हाण यांनी २७ मार्चला दिलेल्या फिर्यादीवरून मोटार सायकल क्रमांक एमएच ३८ एसी ३१६६ च्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास बासंबा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

Chondiamba Armed Attack Death: वसमत तालुक्यातील चोंडी आंबा टी-पॉईंटवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात ६ ऑक्टोबर मंगळवार रोजी धारदार शस्त्राने हल्ला

Oct 06, 2026
अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्‍यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला

अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्‍यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला

Avinash Bangar's death: हिंगोली येथे फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगी अविनाश काशिनाथ बांगर यांनी दुसर्‍यांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतली आणि या प्रयत्नातच त्यांनी स्वतःचा प्राण गमावला.

Oct 06, 2026