रानडुकराच्या हल्ल्यात युवा शेतकरी गंभीर जखमी

रानडुकराच्या हल्ल्यात युवा शेतकरी गंभीर जखमी

Wild Boar Attack

स्थानीक शेतकर्‍यांच्या मदतीने केले रुग्णालयात दाखल

उमरखेड (Wild Boar Attack) : शेतातील ऊसाला पाणी देण्याचे काम करीत असलेल्या युवा शेतकर्‍यावर अचानक रानडुकराने हल्ला करुण गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील चालगणी शेतशिवारात दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० वाजताचे दरम्यान घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेतकर्‍याचे नाव दत्ता भगवान शिन्दे असुन तो आपल्या शेतात ऊस पीकाला पाणी देण्याचे काम करीत होता. परंतु अचानक आलेल्या रानडुकराच्या कळपातील डुकराने सदर शेतकर्‍यास गंभीर जखमी केले असुन परीसरातील शेतीत जवळच काम करीत असलेल्या इतर शेतकर्याच्या नीदर्शनास रानडुककर हलला करीत असल्याची बाब येताच त्याणी प्रचंड आरडा ओरडा करून जखमी शेतक-यास रानडुक्कराचया तावडीतुन सोडवीले गंभीर दुखापत झाल्याने जखमी शेतकर्यास स्थानीक नागरीकाच्या मदतीने तात्काळ उमरखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .

परीसरात वन्यप्राण्यानी धुमाकुळ घातला असुन पीकाच्या नासाडी सह मानवी जीवाला इजा पोहचविण्याच्या घटनात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकर्यात भीतीचे वातावरण नीर्माण झाले असुन वनवीभागाने उच्छाद मांडनार्‍या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करून घटनेत जखमी झालेल्या  शेतकर्‍यास  भरीव अर्थिक मदत द्यावी अशी मागणी पुढे येत आहे .

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026
‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे आणि संपूर्ण अहवालानंतर मदत देण्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.

Sep 28, 2026