विघ्नहर्ता चिंतामणी गणपती

हिंगोलीत विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची पालखी मिरवणूक उत्साहात

Vighnaharta Chintamani Ganpati: नवसाला पावणारा श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची पालखी मिरवणूक गणेश चतुर्थीनिमित्त १४ सप्टेंबर सोमवार रोजी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. टाळ-मृंदगाच्या  गजरात

हिंगोलीत विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची पालखी मिरवणूक उत्साहात

Vighnaharta Chintamani Ganpati

ढोल- ताशांच्या गजरात शहर दुमदुमले..

हिंगोली (Vighnaharta Chintamani Ganpati) : येथील नवसाला पावणारा श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची पालखी मिरवणूक गणेश चतुर्थीनिमित्त १४ सप्टेंबर सोमवार रोजी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. टाळ-मृंदगाच्या  गजरात हि पालखी मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गावरून श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात विसर्जीत झाली.

शहरातील श्री गणपती मंदिराच्या (Vighnaharta Chintamani Ganpati) वतीने गणेशोत्सवादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोलीचा विघ्नहर्ता चिंतामणी गणपती नवसाला पावणारा म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असून राज्यभरातील गणेशभक्त येथे दर्शनासाठी येतात. चिंतामणी गणपतीचा मोदोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यामध्ये भाविकांची मांदियाळी असते.दरम्यान, गणेश चतुर्थीनिमित्त शासकीय विश्रामगृहा जवळून पालखी मिरवणुकीला  प्रारंभ  झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून हि मिरवणुक ढोल-ताशा व टाळ-मृदंगाच्या गजरात  काढण्यात आली. यावेळी बाल वारकर्‍यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

या (Vighnaharta Chintamani Ganpati) पालखी सोहळ्यात नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर, शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक श्रीराम बांगर, नगरसेवक कपील खंडेलवाल  पहेलवान यांच्यासह संस्थानचे सचिव दिलीप बांगर, अध्यक्ष सतीश  लोहिया, पवन मुदंडा,सुरज व्यास, मनोज  दावनगिरे, पप्पु घन,मिलींद राजुरकर, अभय जोशी,  लक्ष्मीकांत  पाठक, प्रेमचंद  जैस्वाल, बद्री मुदंडा, धनंजय मिस्कीन, विजय घन, विद्याधर  डोईफोडे, अनिल बिडकर,  किशोर मिस्कीन, अजय घाटोळे  यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

नवसाच्या मोदकातून अनेकांना मिळाला रोजगार 

नवसाच्या मोदकातून अनेकांना मिळाला रोजगार 

Shri Vighnaharta Chintamani Ganpati: शहराचे आराध्य दैवत असलेल्या नवसाला पावणाऱ्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या नावाने अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालतो, याचा प्रत्यय  गणेशोत्सवात पहायला मिळतो.

Sep 24, 2026
हिंगोलीतील 'नवसाला पावणाऱ्या' श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची महाआरती

हिंगोलीतील 'नवसाला पावणाऱ्या' श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची महाआरती

Shri Vighnaharta Chintamani Ganpati: हिंगोली शहरातील अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या 'नवसाला पावणारा श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती'ची भव्य महाआरती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

Sep 23, 2026
हिंगोलीत 24 व 25 सप्टेंबरला वाहतुकीत बदल; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश

हिंगोलीत 24 व 25 सप्टेंबरला वाहतुकीत बदल; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश

Shri Vighnaharta Chintamani Ganpati: मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतुकीत बदल केले आहेत.

Sep 21, 2026
विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पा समोर शेकडो महिलांनी केले गणपती अथर्वशीर्ष पठण

विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पा समोर शेकडो महिलांनी केले गणपती अथर्वशीर्ष पठण

Vighnaharta Chintamani Ganpati: भक्ती, सेवा आणि संस्कार या त्रिसूत्रीवर कार्य करणाऱ्या स्वयंसिद्धा नारी मंचच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ऋषीपंचमीचे औचित्य साधून सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण

Sep 15, 2026