श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती

नवसाच्या मोदकातून अनेकांना मिळाला रोजगार 

Shri Vighnaharta Chintamani Ganpati: शहराचे आराध्य दैवत असलेल्या नवसाला पावणाऱ्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या नावाने अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालतो, याचा प्रत्यय  गणेशोत्सवात पहायला मिळतो.

नवसाच्या मोदकातून अनेकांना मिळाला रोजगार 

Shri Vighnaharta Chintamani Ganpati

 

श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या कृपेने हिंगोलीत अनेकांच्या हाताला काम

हिंगोली (Shri Vighnaharta Chintamani Ganpati) : शहराचे आराध्य दैवत असलेल्या नवसाला पावणाऱ्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या नावाने अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालतो, याचा प्रत्यय  गणेशोत्सवात पहायला मिळतो. श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ख्याती जिल्ह्यासह राज्यभर आणि परराज्यातही पसरली आहे. येथे नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची मोठी श्रद्धा आहे. अनेक भाविक येथे नवस करतात, काही जण मंदिराजवळूनच नवसाचा मोदक घेऊन घरी वर्षभर त्याची पूजा करतात आणि नवस पूर्ण झाल्यावर पुढच्या वर्षी १०८ किंवा १००८ मोदकांचे वाटप करतात.

भाविकांची हीच श्रद्धा हिंगोलीतील अनेकांसाठी रोजगाराचे साधन बनली आहे. अनेक भाविकांना हिंगोली शहरातच रेडीमेड नवसाचे मोदक मिळत असल्याने ते येथूनच खरेदी करणे पसंत करतात. याचा अंदाज घेऊन शहरातील अनेक महिला, गृहिणी आणि लघु उद्योजक गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात मोदक तयार करून विक्री करतात.

श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी येथे नवसाचे मोदक तयार करून मिळतील असे फलक लागलेले दिसतात. घराघरात महिला पहाटेपासून मोदक, शंकरपाळी सारखे फराळाचे पदार्थ तयार करण्यात गुंतल्या आहेत. यामुळे गणेशोत्सवात अनेकांच्या हाताला काम मिळाले असून बाप्पाच्या कृपेने रोजगाराची  परंपरा  जपली जात आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील 'नवसाला पावणाऱ्या' श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची महाआरती

हिंगोलीतील 'नवसाला पावणाऱ्या' श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची महाआरती

Shri Vighnaharta Chintamani Ganpati: हिंगोली शहरातील अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या 'नवसाला पावणारा श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती'ची भव्य महाआरती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

Sep 23, 2026
हिंगोलीत 24 व 25 सप्टेंबरला वाहतुकीत बदल; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश

हिंगोलीत 24 व 25 सप्टेंबरला वाहतुकीत बदल; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश

Shri Vighnaharta Chintamani Ganpati: मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतुकीत बदल केले आहेत.

Sep 21, 2026