शेतकरी कर्जमुक्ती योजना

सरकारची कर्जमुक्ती शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी!

Farmer Loan Waiver Scheme: शेतकरी संघटनाने आरोप दिले की कर्जदार व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकर्यांना भेदभात झाला आहे. सारसकट मुकतीची मागणी केली गेल्यामुळे शेतकऱ्यांचा आंदोलन

सरकारची कर्जमुक्ती शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी!

Farmer Loan Waiver Scheme


क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप; सरसकट कर्जमाफीची मागणी

लातूर (Farmer Loan Waiver Scheme) : गेली दोन वर्षे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी निकष, अटी, शर्थी यांचा शोध घेण्यामध्ये व्यस्त आहे. सरकारच्या मते कर्जमुक्तीमध्ये कमीत कमी शेतकरी डाव आहे, असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी केला आहे.

याबाबत पटेल यांनी पत्रक प्रसिद्ध दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा रेटा वाढल्यानंतर सरकारने कर्जमाफी जाहीर केली. त्याचसोबत नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या विषयी संभ्रम तयार केला .कर्जदार शेतकरी व नियमित कर्जफेड करणारे शेतकरी असा भेदभाव करून कर्जदारांना 2 लाख तर नियमित कर्ज फेड करणाऱ्याला 50 हजार असा भेदभाव केला. या अगोदर झालेल्या कर्जमाफीमध्ये असा भेदभाव झाल्याचे दिसत नाही. सरसकट कर्जमुक्ती याचा अर्थ असा होतो की, कर्जदार शेतकरी मग तो थकबाकीदार असो वा चालू बाकीदार असो, सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. परंतु हे सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडत आहे. शेतकऱ्यांच्या प्रति चुकीचे धोरण राबवित आहे व तारीख पे तारीख, असे धोरण चालू आहे, असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

सध्या खरीप हंगाम तोंडावर आहे. म्हणण्यापेक्षा मृग नक्षत्र संपला आहे. शेतकरी दुहेरी कचाट्यात सापडला आहे. थकबाकीमुळे बँकाही त्याला कर्ज देत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला सरकारची कर्जमाफी सुद्धा त्याला लवकर मिळण्याची शक्यता नाही. सरकार तारीख पे तारीख लावून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. (Farmer Loan Waiver Scheme) सरकारने विनाअट सरसकट कर्जदार शेतकरी व नियमित कर्जफेड करणारा शेतकरी सर्वांना प्रत्येकी दोन-दोन लाख रुपये तात्काळ देण्याची व्यवस्था करावी; अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखला अडीच तास महामार्ग!

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखला अडीच तास महामार्ग!

Marathwada Farmers' Protest: पावसाची अनिश्चितता, शेतीमालाला अपेक्षित भावाचा अभाव, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर महामार्गावर उद्रेक

Aug 23, 2026
पोतरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला शेतकर्‍यांनी ठोकले कुलूप

पोतरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला शेतकर्‍यांनी ठोकले कुलूप

Potara Veterinary Clinic: कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावात पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी हजर नसल्याने गायीवर योग्य उपचार न झाल्याने तिचे वासरू दगावल्याची संतापजनक घटना घडली

Aug 20, 2026
परभणीत आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

परभणीत आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

Parbhani Dharane Protest: केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी व जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. तसेच चार कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करण्याच्या मागणी

Aug 11, 2026
..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

Hingoli Farmers' March: शेतकरी कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांना हिंगोलीत आणून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

Aug 04, 2026
कर्जमाफी यादी आणि बँकेच्या आकडेवारीत मोठी तफावत

कर्जमाफी यादी आणि बँकेच्या आकडेवारीत मोठी तफावत

Farmer Loan Waiver List: प्रशासनाने जाहीर केलेली यादी, केवायसी (KYC) पावती आणि बँकेकडून प्रत्यक्षात लिहून दिलेली रक्कम यामध्ये कोणतीही सुसंगती नसल्याने सर्वकाही विस्कळीत झाले

Jul 28, 2026