Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

मराठवादा शेतकरी आंदोलन

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखला अडीच तास महामार्ग!

Marathwada Farmers' Protest: पावसाची अनिश्चितता, शेतीमालाला अपेक्षित भावाचा अभाव, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर महामार्गावर उद्रेक


दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखला अडीच तास महामार्ग

Marathwada Farmers' Protest |

औसा (Marathwada Farmers' Protest) : पावसाची अनिश्चितता, शेतीमालाला अपेक्षित भावाचा अभाव, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर महामार्गावर उद्रेक झाला.  मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत प्रोत्साहन पर अनुदान द्यावे, या मागणीसाठी तालुक्यातील लामजना येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी तब्बल अडीच तास महामार्ग रोखून सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे, ही आंदोलनातील प्रमुख मागणी होती. कर्ज वेळेवर फेडणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यालाच शासनाच्या मदतीपासून वंचित का ठेवले जाते, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. शेतीचा वाढता खर्च, बाजारभावातील अनिश्चितता आणि निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले असून, अशा परिस्थितीत शासनाने ठोस आधार देणे आवश्यक असल्याचे संघटनेने सांगितले. गतवर्षी अतिवृष्टीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली साडेसतरा हजार रुपयांची विम्याच्या स्वरूपातील मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणीही करण्यात आली. घोषणा झाल्यानंतरही मदतीसाठी शेतकऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने (Marathwada Farmers' Protest) खरीप हंगाम संकटात आला आहे. पिके पाण्याच्या प्रतीक्षेत असून शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागली आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळी निकषानुसार सर्व सुविधा लागू कराव्यात आणि प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. एक रुपयात चार ट्रिगरची पीकविमा योजना पूर्ववत करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष संरक्षण द्यावे, अशीही मागणी करण्यात आली. विमा भरूनही नुकसानभरपाईसाठी होणारी धावपळ, पंचनामे आणि कागदोपत्री प्रक्रियेत शेतकरी अडकत असल्याने विमा योजनेचा लाभ सुलभ पद्धतीने मिळावा, अशी भूमिका संघटनेने मांडली. सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा येत्या काळात मंत्री आणि आमदारांना गावखेड्यात फिरणेही मुश्किल होईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

यांचा आंदोलनात सहभाग...
या (Marathwada Farmers' Protest) आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कोअर कमिटी सदस्य राजेंद्र मोरे, कार्याध्यक्ष सत्तार पटेल, लातूर जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी, प्रज्योत हुडे, नवनाथ शिंदे, बालाजी शिंदे, दत्ता किनीकर, विनोद हिरमिरे, आकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्य तानाजी जाधव, विलास काळे, विजयकुमार बाजुळगे, जीवन बप्पा पाटील, भरत पाटील, आकाश गंगथडे, गौतम कांबळे, सतीश सोळंके, शिवाजी पाटील, शाहूराज कांबळे, अमीर पटेल, बाजार समितीचे माजी संचालक महेश पाटील यांच्यासह विविध गावांतील सरपंच, चेअरमन आणि हजारो शेतकरी सहभागी झाले होते.