Stray Cow

हिंगोलीत धुमाकूळ घालणाऱ्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

Stray Cow

नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास; गाय ताब्यात घेताना नगरपालिकेचा एक कर्मचारी जखमी

हिंगोली : शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर पिसाळल्यासारखी वावरणाऱ्या गायीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडत असल्याने या मार्गावरील नागरिकांमध्ये चिंता होती.

या गंभीर बाबीची माहिती १३ सप्टेंबर, रविवार रोजी प्रभागातील काही नागरिकांनी नगरसेविका सौ. सोनाली गोटरे आणि माजी नगरसेवक विशाल गोटरे यांना दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधून सदरील गायीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

या माहितीची दखल घेत मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह नगरपरिषदेचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पथकाने शर्थीचे प्रयत्न करत अखेर पिसाळलेल्या गायीला ताब्यात घेतले.

गाय ताब्यात घेत असताना नगरपरिषदेचे कर्मचारी दिनेश वर्मा यांना किरकोळ दुखापत झाली. अखेर गाय ताब्यात घेतल्याने ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवरील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ केलेल्या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या मोहिमेत नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील दिनेश वर्मा, सुधाकर मोकाटे, काशिनाथ लग्गड, सतीश सोनवणे आणि नागेश चव्हाण यांनी सहभाग नोंदवला.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
आगीतील जखमी कर्मचार्‍यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर

आगीतील जखमी कर्मचार्‍यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर

Municipal President Rekhatai Bangar: शहरांमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग लागून घडलेल्या घटनेत आगीत होरपळलेल्या जखमी नगरपालिका कर्मचार्‍यास प्रत्येकी एक लाखाची मदत नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम  बांगर

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026