ॲसिडिटी समजून दुर्लक्ष… पण तो होता सर्पदंश… १९ वर्षांच्या साक्षीचा दुर्दैवी अंत

लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे 19 वर्षीय तरुणीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

ॲसिडिटी समजून दुर्लक्ष… पण तो होता सर्पदंश… १९ वर्षांच्या साक्षीचा दुर्दैवी अंत

Snake Bite

बुलढाण्यात तरुणीचा हृदयद्रावक मृत्यू

बुलढाणा (Snake Bite) : सध्या राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत. कधी ऊन, कधी दमट हवा, तर सकाळी गार वारे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम केवळ माणसांवरच नव्हे तर प्राणी आणि सरीसृपांवरही होत आहे. विशेषतः सापांसाठी हे वातावरण अस्वस्थ करणारे ठरत असून, त्यामुळे ते बिळाबाहेर येऊन सुरक्षित ठिकाण शोधू लागतात. परिणामी सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशाच एका हृदयद्रावक घटनेने बुलढाणा जिल्हा हादरला आहे.

लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे 19 वर्षीय तरुणीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रवींद्र शेषराव सानप यांची मुलगी साक्षी ही शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे आई-वडिलांसोबत झोपली होती. मात्र रात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच तिला सापाने चावा घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शनिवारी सकाळी उठल्यानंतर साक्षीला घशात वेदना जाणवत होत्या, तसेच तिला ॲसिडिटीसारखा त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी सुरुवातीला त्याकडे सामान्य आजार म्हणून पाहिले. तरीही तिची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच तिला तातडीने लोणार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाही तिच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा दिसून आली नाही. सर्पदंशाची लक्षणे स्पष्ट होत गेल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मेहकर येथे हलवण्याचा सल्ला दिला.

मात्र, मेहकरकडे नेत असताना वाटेतच साक्षीची प्राणज्योत मालवली. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नंतर परिसरात शोध घेतल्यावर संबंधित साप शेजारील अंगणात आढळून आला, त्यामुळे सर्पदंशामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

साक्षी ही सुलतानपूर येथील बी. फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. तिच्या अकाली निधनाने गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय तपासणीनंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा तसेच नातेवाईक असा मोठा परिवार आहे.

या घटनेमुळे ग्रामीण भागात सर्पदंशाविषयी जागरूकता वाढवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. बदलत्या हवामानात विशेष खबरदारी घेणे, घराभोवती स्वच्छता राखणे आणि अशा प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय मदत घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

संबंधित सामग्री

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’  गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’ गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

बुलढाण्यात संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील वाद पुन्हा पेटला. ‘बुलढाण्याचा बिहार’ टीकेला गायकवाडांनी चिखलीतील आरोपांसह प्रत्युत्तर दिले.

Sep 30, 2026
शेतकरी जगला तरच देश जगणार; बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

शेतकरी जगला तरच देश जगणार; बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

Buldhana Shiv Sena Akrosh: यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने..

Sep 29, 2026
मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

बुलढाण्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त यादीत; ‘ट्रिगर-१’ लागू. आमदार चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश.

Sep 26, 2026
कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफीची रक्कम मिळूनही IOB एकलारा शाखेतील २८८ शेतकऱ्यांची खाती बंद नाहीत. नवीन पीक कर्जासाठी चार तास ठिय्या आंदोलनानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश.

Sep 26, 2026