बुलढाणा शिवसेना आक्रोश

शेतकरी जगला तरच देश जगणार; बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

Buldhana Shiv Sena Akrosh: यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने..

शेतकरी जगला तरच देश जगणार; बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

Buldhana Shiv Sena Akrosh

 

कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी

चिखली (Buldhana Shiv Sena Akrosh) : यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘धडक आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना उपनेते आमदार नितीन बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची तातडीने मदत द्यावी, तसेच पीकविमा व इतर शासकीय योजनांचा लाभ तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. मोर्चात शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, पक्ष प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, ॲड. सुमित सरदार, जिल्हा संघटक गोपाल बचीरे, जिल्हा समन्वयक गजानन धांडे, सागरताई पुरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यंदा पावसातील अनिश्चितता आणि पिकांवरील संकटामुळे बळीराजासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष किशोर गारोळे, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, महिला संघटिका तथा सहसंपर्कप्रमुख उर्मिला ठाकरे, महिला संघटिका विजयाताई खडासन, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, लखन गाडेकर, बद्री बोडके, विलास सुडकर यांच्यासह चारही विधानसभा मतदारसंघांतील तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘बळीराजाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील’, असा निर्धार यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.