शिरसोली स्मशानभूमी

ग्राम शिरसोली येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावा

Shirsoli Cemetery: शिरसोलीतील स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी ग्रामस्थ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्टच्या प्रमुखांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ग्राम शिरसोली येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावा

Shirsoli Cemetery

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्टचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

नांदुरा (Shirsoli Cemetery) : तालुक्यातील ग्राम शिरसोली येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज दिनांक 27 .04. 2026 ला मलकापूर येथील सेवाभावी संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अजय प्रभाकरराव सावळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी माननीय संतोषराव शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले. तर उपविभागीय अधिकारी साहेबांनी  प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावतो असे आश्वासन दिले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदुरा तालुक्यातील ग्राम सिरसोडी (Shirsoli Cemetery) येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित पडला आहे. यासंदर्भात गावचे सरपंच पती हर्षवर्धन सपकाळ आणि ग्रामस्थांनी माननीय पालकमंत्री मकरंद जी पाटील, जिल्हाधिकारी साहेब तसे नांदुरा तहसीलदार यांना संदर्भात वेळोवेळी निवेदन दिले. परंतु त्यानंतरही कोणतेही प्रकारची या प्रकरणात कार्यवाही झाली नाही. म्हणून आज दिनांक 27.0 4 .2026 ला सरपंच पती, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील शेकडो महिला आणि पुरुष यांनी उपविभागीय अधिकारी यांना मलकापुर येथील सेवाभावी संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अजय प्रभाकर सावळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. आणि सदर प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे सदस्य भीमराव नितुने,मोहन शिरसाट, संजय वानखडे  उपस्थित होते. तर ग्रामस्थांतर्फे गजानन वानखडे ,शिवदास वानखडे ,देवानंद वानखडे ,संतोष गवई सुभाष वानखडे ,मनोहर सरदार ,गजानन वानखडे ,दीपक वानखडे ,विकास वानखडे ,अनुज वानखडे, कडू किसन वानखडे , नारखेडे ,नितेश वानखेडे ,संतोष गवई,  , वच्छलाबाई इंगळे ,आरती वानखेडे ,सोनाबाई तेलंग ,निर्मलाबाई वानखडे, इंदुबाई खराटे ,आशाबाई वानखडे, साधना वानखडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित सामग्री

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.

Oct 04, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.

Sep 29, 2026
जिल्हास्तरीय शालेय थांग-ता क्रीडा स्पर्धेत नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांची उपस्थिती

जिल्हास्तरीय शालेय थांग-ता क्रीडा स्पर्धेत नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांची उपस्थिती

Thang-Ta Sports Competition: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडेलाही तितकेच महत्त्व आहे. थांग-ता सारख्या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास...

Sep 29, 2026
चिखलीत जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

चिखलीत जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

Rifle Shooting Competition: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आणि क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने, हालेलुया नॅशनल..

Sep 28, 2026
मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

बुलढाण्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त यादीत; ‘ट्रिगर-१’ लागू. आमदार चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश.

Sep 26, 2026