रायफल शूटिंग स्पर्धा

चिखलीत जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

Rifle Shooting Competition: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आणि क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने, हालेलुया नॅशनल..

चिखलीत जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

Rifle Shooting Competition

 

३० खेळाडूंची विभागीय स्तरासाठी निवड; अमरावती येथे होणार पुढील स्पर्धा

चिखली (Rifle Shooting Competition) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आणि क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने, हालेलुया नॅशनल एज्युकेशन सोसायटी, चिखली व हालेलुया शूटिंग रेंजच्या तांत्रिक सहकार्याने जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या. दि. २४ ते २८सप्टेंबरदरम्यान हालेलुया शूटिंग रेंज, चिखली येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पीप साईट एअर रायफल, एअर पिस्तूल आणि ओपन साईट एअर रायफल या विविध प्रकारांत खेळाडूंनी आपले नेमबाजी कौशल्य पणाला लावले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. बक्षीस वितरण समारंभात विद्याधर महाले यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर क्रीडा क्षेत्रात मोठी प्रगती साधता येते, असे सांगितले.

सुवर्णपदक विजेते: अद्वैत अभिजीत वडाळकर, नीतीक्षा विनोद झाल्टे, अमित विनोद गिरी, अनुष्का विजय परिहार, अल्पेश सुनील मुळे, रुद्र भारत चिरखे, रेवती गजानन नखोद, आदित्य मुकेश भवर, श्रुती संतोष मोरे, विनय सखाराम जाधव, आरुषी नितीन अपार, पृथ्वीराज निंबाजी साळोख, रिया मुकेश कडू, हर्षवर्धन अमोल तिडके, समीक्षा गजानन शिरसाठ, हर्ष शरदराव बकाल व दिव्या सुधाकर ठाकरे.

रजतपदक विजेते: सन्मित सौरभ सराफ, सृष्टी सुचेत देशमुख, समर्थ सुनील गाभणे, आर्यन रजनी सुनील गवारगुर, उदय निंबाजी साळोख, प्रीत संजीव यंगड, संचित जयदीप ताठे, सोनाक्षी सुधाकर शेळके, सार्थक प्रदीप शिरसाट, ओंकार प्रशांत कुलकर्णी, रितिका मुकेश कडू, निखिल परमेश्वर हाडे व रिया आनंद सदावर्ते.
कांस्यपदक विजेते: श्लोक सचिन खुणारे, शौर्या प्रवीण बाहेकर, वेद गणेश सराफ, समर्थ नंदकिशोर मेरेकर, उत्कर्ष अनिल बाहेकर, यशोदीप विजय परिहार, जानराव गोविंदा राजे, स्नेहा अरुण पडोळ, धनराज निवृत्ती जाधव व संजीवनी निवृत्ती जाधव.

स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या या खेळाडूंनी विभागीय स्तरासाठी पात्रता मिळविली असून, दि. १, २ व ३ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे होणाऱ्या विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेत ते सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी कोच डॉ. संजीव यंगड यांनी सांभाळली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या क्रीडा अधिकारी सौ. लांडगे मॅडम यांचीही स्पर्धेला उपस्थिती होती. हालेलुया इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ. मोनालिसा संजीव यंगड यांनी शूटिंग रेंज उपलब्ध करून देत स्पर्धेच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. असिस्टंट रेंज ऑफिसर म्हणून कु. प्रज्ञा राजू लहाने यांनी जबाबदारी पार पाडली.

समुद्रे सर, भारत नाडे, अरुण पडोळ, संतोष मोरे, साळोख सर, अस्लम भाई, अनिता संतोष खरात, मनिषा राठोड, राहुल महाजन, सचिन गायकवाड, राहुल खरात, गीत संजीव यंगड तसेच सर्व क्रीडा शिक्षकांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. चिखलीच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत केलेली कामगिरी आता विभागीय स्तरावरही उल्लेखनीय ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.