Shaktipeeth Highway

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेले अधिकारी परतले

सिंदगी येथे शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी मोजणीला शेतकरी व ग्रामस्थांचा विरोध; मोजणी न करताच महसूल विभागाचे पथक परतले.

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेले अधिकारी परतले

Shaktipeeth Highway

मोजणीला ग्रामस्थांचा ठाम नकार; ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द’च्या घोषणा

कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने मोजणी करण्यासाठी आलेल्या महसूल विभागाच्या पथकाला शेतकरी व ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. ग्रामस्थांनी मोजणीस स्पष्ट नकार दिल्याने अधिकाऱ्यांना मोजणी न करताच परतावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने २२ सप्टेंबर रोजी सिंदगी येथे महसूल विभागाचे पथक मोजणीसाठी दाखल झाले होते. याची माहिती मिळताच गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

‘एकच जिद्द, शक्तिपीठ महामार्ग रद्द’ अशा घोषणा देत ग्रामस्थांनी मोजणीस विरोध दर्शविला. शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत कोणत्याही प्रकारची मोजणी होऊ देणार नाही, तसेच प्रशासनाच्या कोणत्याही कार्यवाहीला सहकार्य करणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

या वेळी गावातील लोकप्रतिनिधींसह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मोजणीच्या कामासाठी मंडळ अधिकारी के. बी. पावडे, शिरस्तेदार आर. ए. शेख, तलाठी विकास पंडित यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मात्र, ग्रामस्थांनी मोजणी करण्यास स्पष्ट नकार दिल्याने प्रशासनाला आपली कार्यवाही थांबवावी लागली.

ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे अखेर महसूल विभागाच्या पथकाला मोजणी प्रक्रिया अर्धवट सोडून परत जावे लागले.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026