पातूर (Shahbabu Junior College Result) : शाहबाबू एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित शाहबाबू ज्युनिअर कॉलेज, पातूरच्या इयत्ता १२ वीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राहिली असून विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ९०.३८ टक्के लागला आहे. परीक्षा मंडळाने इयत्ता १२ वीचा निकाल २ मे रोजी जाहीर केला.
विज्ञान शाखेतून ३८१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व ३८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच कला शाखेतून १०४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अशा प्रकारे एकूण ४८५ विद्यार्थ्यांपैकी ४७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा एकूण निकाल ९७.९३ टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेत उफैरा फिरदौस मो. असगर हिने ९६.९७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शेख सुफियान शेख सुल्तान याने ८७% गुणांसह द्वितीय तर अशर जैद निसार खान याने ८६.९७% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे.
कला शाखेत अनम परवीन मो. जाकिर हिने ८४.८३% गुणांसह प्रथम क्रमांक, अल्फिया अनम अब्दुल जमीर हिने ८४.१७% गुणांसह द्वितीय आणि जोया फातेमा जावेद खान हिने ८३.५०% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे.
महाविद्यालयातून विशेष प्राविण्य श्रेणीत ८४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १९६ विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणीत १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाहबाबू एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सै. इसहाक राही यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक, सै. इसहाक राही सर, प्राचार्य मुजीबउल्ला खान, उपप्राचार्य एहसान उर रहमान तसेच सर्व प्राध्यापकांना दिले आहे.