ट्युशन नाही, तरीही टॉपर – आष्टीतील मिसबाहचा संघर्षमय प्रवास!

जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांचे जिवंत उदाहरण म्हणजे आष्टीतील विद्यार्थिनी कु. मिसबाह नियाजी फातिमा.<br/>

ट्युशन नाही, तरीही टॉपर – आष्टीतील मिसबाहचा संघर्षमय प्रवास!

Wardha Topper​​​​​​​

आष्टीतील मिसबाह फातिमाची विज्ञान शाखेत जिल्ह्यात बाजी

आष्टी (Wardha Topper) : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर कोणत्याही अडचणींवर मात करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आष्टी येथील हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. मिसबाह नियाजी फातिमा होय. बारावीच्या विज्ञान शाखेच्या निकालात तिने 95.67 टक्के गुण मिळवत वर्धा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे जीवशास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत तिने आपल्या गुणवत्तेची ठळक छाप पाडली असून संपूर्ण परिसरात तिच्या यशाचे कौतुक होत आहे.

जिद्दीची कमाल; 95.67 टक्क्यांसह विज्ञान शाखेत प्रथम

मिसबाहचा परिवार अत्यंत साधा आहे. आई-वडील आणि दोन बहिणी असे तिचे कुटुंब असून ते आजही तीन खोल्यांच्या कवेलूच्या घरात वास्तव्यास आहेत. तिचे वडील हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोणतीही खाजगी शिकवणी न लावता, केवळ स्वतःच्या जिद्दीवर आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनावर तिने हे यश संपादन केले.

महाविद्यालयातील नियमित उपस्थिती, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या त्रिसूत्रीच्या बळावर मिसबाहने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. तिच्या यशामागे आई-वडील तसेच शिक्षकवृंद यांचे मोलाचे योगदान आहे.

तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य पी. जी. नागतोडे, उपमुख्याध्यापिका विणा तांबसकर, पर्यवेक्षक सुनील ईखार तसेच सागर सव्वालाखे आणि शिक्षकवृंद यांनी तिच्या घरी जाऊन तिचा व तिच्या पालकांचा सत्कार केला.

तसेच हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल ठाकरे, सचिव विनायकराव होले, उपाध्यक्ष डॉ. किशोर गंजीवाले, सहसचिव भरत वणझरा, कोषाध्यक्ष शंकरराव नागपुरे तसेच सदस्य राजाभाऊ सव्वालाखे व अर्पित मालपे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित सामग्री

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.

Sep 30, 2026
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर महासंघाची बैठक झाली. UDISE+ मधील तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन मिळाले.

Sep 29, 2026
दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

Polytechnic Engineering Admission: दहावीनंतर बारावी आणि अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेण्याऐवजी पॉलिटेक्निकमधून पदविका करून अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

Sep 29, 2026
शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

मिसाळवाडी शाळेतील शिक्षक नियुक्तीवरून वाद चिघळला. ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून, प्रशासनाने निर्णय न बदलल्यास मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sep 19, 2026
SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४१ वी SET परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता परीक्षा २५ ऑक्टोबरला होणार असून वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल झाला आहे.

Sep 15, 2026