बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ८९.७९ टक्के; मुलींनी पुन्हा मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज अधिकृतरीत्या घोषित करण्यात आला आहे.

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ८९.७९ टक्के; मुलींनी पुन्हा मारली बाजी

Maharashtra HSC Result 2026

(Maharashtra HSC Result 2026) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज अधिकृतरीत्या घोषित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे.  राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे.

पुणे, मुंबईसह अनेक विभागांचा निकाल समाधानकारक लागला असून सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना https://mahahsscboard.in/ या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. (MSBSHSE result)

राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

 निकालाची महत्त्वाची आणि ठळक वैशिष्ट्ये

  • राज्याचा एकूण निकाल: ८९.७९%

  • मुलींचा निकाल: ९३.१५%

  • मुलांचा निकाल: ८६.८०%

  • सर्वात जास्त निकाल असलेला विभाग: कोकण

 विभागनिहाय निकाल (Maharashtra HSC result 2026 pass percentage details)

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागातून १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

  • पुणे: ९१.२५

  • नागपूर: ८८.६७

  • छत्रपती संभाजीनगर: ८८६८

  • कोल्हापूर: ८९.९७

  • अमरावती: ९०.९२

  • नाशिक: ९०..७२

  • लातूर: ८४.१४

  • कोकण: ९४.१४

  • मुंबई: ९०.०८

 कोकण विभागाने यंदाही आपला दबदबा कायम राखत सर्वाधिक निकाल नोंदवला असून मुंबई आणि पुणे विभागांमध्येही चुरशीची कामगिरी दिसून आली आहे.

 

संबंधित सामग्री

शेगाव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेची पोथ लांबवली; पोलिसांच्या तत्परतेने महिला ताब्यात

शेगाव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेची पोथ लांबवली; पोलिसांच्या तत्परतेने महिला ताब्यात

संतनगरी शेगाव बसस्थानकावर गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कमला एकादशी आणि गुरुवार असल्याने भाविक व प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

Jun 11, 2026
सुनेत्रा पवार यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; NDA बैठकीसाठी दिल्लीला रवाना होण्यास झाला दोन तासांचा विलंब

सुनेत्रा पवार यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; NDA बैठकीसाठी दिल्लीला रवाना होण्यास झाला दोन तासांचा विलंब

महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या एका घटनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Jun 11, 2026
विदर्भातील शाळा ३० जूननंतरच सुरू होणार

विदर्भातील शाळा ३० जूननंतरच सुरू होणार

विदर्भातील शाळा १५ जून तसेच त्यानंतर २२ जूनपासून सुरू करण्याचे राज्य शासनाचे निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरविले आहेत.

Jun 10, 2026
वर्धा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलीच आघाडीवर; मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.१० टक्के

वर्धा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलीच आघाडीवर; मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.१० टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला.

May 08, 2026
दहावी निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के; मुलींची पुन्हा आघाडी

दहावी निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के; मुलींची पुन्हा आघाडी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

May 08, 2026