सकल मराठा समाज

राजकीय अनुषंगाने सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार

Sakal Maratha Samaj: मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करीत आहेत. अनेक दिवस उलटले तरी शासन सकारात्मक निर्णय घेत नाही

राजकीय अनुषंगाने सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार

Sakal Maratha Samaj

हिंगोली (Sakal Maratha Samaj) : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करीत आहेत. अनेक दिवस उलटले तरी शासन सकारात्मक निर्णय घेत नाही, त्यामुळे १२ सप्टेंबरला पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात राजकीय पक्षातर्फे आयोजित केलेल्या सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार असल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात (Sakal Maratha Samaj) सकल मराठा समाजातर्फे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत भूषण देशमुख, विनायकराव भिसे पाटील, माधव कोरडे, अ‍ॅड. अमोल जाधव, मनिष आखरे, प्रविण जाधव, बाजीराव इंगोले, अ‍ॅड. वैभव शिंदे, गजानन जाधव, अ‍ॅड. नवनाथ पारोकर, अ‍ॅड. नामदेव सपाटे यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पुढे सांगितले की, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने यापूर्वी अनेक आंदोलन झाले. परंतु सर्वच्या सर्वच आंदोलन सनदशिर मार्गाने करण्यात आले. मराठा समाजातील तरूणांच भल व्हाव या उद्देशाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची धडपड सुरूच आहे. मागील काही दिवसापासून त्यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

परिणामी त्यांची प्रकृति गंभीर होत आहे. त्यामुळे शासनाने लवकर निर्णय घेऊन मराठा आरक्षणाचा मार्ग मार्गी लावावा विशेष म्हणजे अनेक आयोगाचे जवळपास ८० टक्के निकष आरक्षणाच्या बाजूने आहेत. परंतु आरक्षण देण्याकरीता चालढकल केली जात आहे. १२ सप्टेंबरला पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरणार असल्याने जिल्ह्यातून जवळपास ५० हजार मराठा सेवक अंतरवाली सराटी येथे जाणार असल्याने त्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले.

टैग्स: Sakal Maratha Samaj

संबंधित सामग्री

वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली 

वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली 

Sakal Maratha Samaj Rally: वसमत येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमत येथे मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली खांडेगाव सर्कल

Sep 07, 2026
वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

Sakal Maratha Samaj: वसमत येथे सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली या बैठकीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आठवडाभर शांततेच्या मार्गाने आंदोलन

Sep 06, 2026
कौठा पाटीवर सकल मराठा समाजातर्फे रास्तारोको

कौठा पाटीवर सकल मराठा समाजातर्फे रास्तारोको

Sakal Maratha Samaj: मराठा योद्धा मनोज  जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Sep 04, 2026
सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदची हाक

सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदची हाक

Sakal Maratha Samaj: संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी हिंगोली शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्याबाबत सकल मराठा समाज

Sep 03, 2026
सकल मराठा समाजाकडून भेंडेगाव पाटीवर रास्ता रोको आंदोलन

सकल मराठा समाजाकडून भेंडेगाव पाटीवर रास्ता रोको आंदोलन

Sakal Maratha Samaj: वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ३ सप्टेंबर गुरुवार रोजी भेंडेगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन शांततेत करण्यात आले.

Sep 03, 2026