वसमत (Sakal Maratha Samaj Rally) : वसमत येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमत येथे मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली खांडेगाव सर्कल व कवठा सर्कल मधील समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले होते अत्यंत शांततेत ही रॅली पार पडली आंदोलन सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक सर्कल मधून दररोज नियोजनबद्ध आंदोलन करण्यात येणार आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाचे नियोजन केल्यानंतर पहिल्या दिवशी खांडेगाव सर्कल व कवठा सर्कलच्या समाज बांधवांच्या वतीने ट्रॅक्टर व मोटरसायकल रॅली वसमत मध्ये काढण्यात आली. (Sakal Maratha Samaj Rally) रॅली द्वारे तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर वसमत तहसील कार्यालया समोर आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेले रविकिरण वाघमारे यांना पाठिंबा देण्यात आला. सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आरक्षण मुद्द्यावर आंदोलन सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे ते अंतर्गत पहिल्या दिवशी कवठा व खांडेगाव सर्कल मधून आंदोलन प्रारंभ करण्यात आले दर दिवशी प्रत्येक सर्कलमधील समाज बांधव आपापल्या परीने या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
सकल मराठा समाज रॅली
वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली
Sakal Maratha Samaj Rally: वसमत येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमत येथे मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली खांडेगाव सर्कल
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Sakal Maratha Samaj Rally
टैग्स:
Sakal Maratha Samaj Rally