वसमत (Sakal Maratha Samaj) : वसमत येथे सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली या बैठकीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आठवडाभर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रवी किरण वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषण स्थळी रविवारी सकल मराठा समाज बांधवांची बैठक घेण्यात आली.
या (Sakal Maratha Samaj) बैठकींत ७ ते १३ सष्टेंबर या कालावधीत आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे सप्ताहामध्ये दररोज विविध सर्कलमध्ये आंदोलन करण्याची नियोजन करण्यात आली आहे. यामध्ये ७ सप्टेंबर: कवठा व खांडेगाव सर्कल, ८ सप्टेंबर: आसेगाव व गिरंगाव सर्कल, ९ सप्टेंबर: कुरुंदा हयातनगर सर्कल, १० सप्टेंबर: वसमत शहर,११ सप्टेंबर बाबुळगाव टेंभुर्णी १२ सप्टेंबर: आंबा व पांगरा शिंदे, १३ सप्टेंबर: हट्टा व करंजाळा सर्कल मधील समाज बांधव शांततेच्या मार्गाने आंदोलन करतील, असे ठरवण्यात आले आहे. यावेळी उपोषणार्थी रविकिरण वाघमारे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यात आला. बैठकीसाठी सकल मराठा समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन
Sakal Maratha Samaj: वसमत येथे सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली या बैठकीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आठवडाभर शांततेच्या मार्गाने आंदोलन
Sakal Maratha Samaj
संबंधित सामग्री
राजकीय अनुषंगाने सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार
Sakal Maratha Samaj: मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करीत आहेत. अनेक दिवस उलटले तरी शासन सकारात्मक निर्णय घेत नाही
वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली
Sakal Maratha Samaj Rally: वसमत येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमत येथे मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली खांडेगाव सर्कल
कौठा पाटीवर सकल मराठा समाजातर्फे रास्तारोको
Sakal Maratha Samaj: मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदची हाक
Sakal Maratha Samaj: संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी हिंगोली शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्याबाबत सकल मराठा समाज
सकल मराठा समाजाकडून भेंडेगाव पाटीवर रास्ता रोको आंदोलन
Sakal Maratha Samaj: वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ३ सप्टेंबर गुरुवार रोजी भेंडेगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन शांततेत करण्यात आले.