क्रांतिकारी शेतकरी संघटन

दुष्काळाच्या पोकळ शासन निर्णयाची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे होळी

Revolutionary Farmers' Organization: सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकरी भीषण पावसाअभावी संकटात सापडलेला असताना शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळासंदर्भातील शासन निर्णयातून शेतकऱ्यांच्या हातात ठोस मदत

दुष्काळाच्या पोकळ शासन निर्णयाची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे होळी

Revolutionary Farmers' Organization

गोरेगाव (Revolutionary Farmers' Organization) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकरी भीषण पावसाअभावी संकटात सापडलेला असताना शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळासंदर्भातील शासन निर्णयातून शेतकऱ्यांच्या हातात ठोस मदत पडणार नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने  शासन निर्णयाची २६ सप्टेंबर शनिवार रोजी प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुष्काळाची पोकळ घोषणा नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या, सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळालीच पाहिजे, कोरड्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या अशा घोषणा दिल्या.

जिल्ह्यात अनेक भागांत पावसाअभावी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हळद यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके हातची गेली असताना केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होणार नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष आर्थिक मदत जमा झाली पाहिजे, अशी भूमिका (Revolutionary Farmers' Organization) संघटनेने घेतली.

तसेच कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले असूनही ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, अशा शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती आणि कशी मदत मिळणार, याबाबत स्पष्टता आणि पुरेशी आर्थिक तरतूद आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रमुख मागण्या मध्ये  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ₹१ लाख नुकसानभरपाई द्यावी. कोरड्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्यावी. कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही पीक कर्जापासून वंचित शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ठोस आणि प्रत्यक्ष आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे.

दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पारदर्शक पंचनामे करून नुकसानभरपाई तातडीने अदा करावी.शेतकरी संकटात असताना कागदावरील घोषणा नकोत; शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा करा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे.

संबंधित सामग्री

पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये! 

पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये! 

Pik Vima Company: लातूरमध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात शेतकरी संघटनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. खरीप पीक विमा योजनेतील अनियमितता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.

May 08, 2026
हिंगोलीत हळदीचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचा उद्रेक

हिंगोलीत हळदीचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचा उद्रेक

Hingoli Turmeric Farmer: हिंगोलीत हळदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप उसळला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने वाशिम-जिंतूर महामार्गावर हळदीची होळी करत आंदोलन केले.

Apr 22, 2026