Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > शेती

हिंगोली हळद शेतकरी

हिंगोलीत हळदीचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचा उद्रेक

Hingoli Turmeric Farmer: हिंगोलीत हळदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप उसळला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने वाशिम-जिंतूर महामार्गावर हळदीची होळी करत आंदोलन केले.


हिंगोलीत हळदीचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचा उद्रेक

Hingoli Turmeric Farmer |

क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून हळदीची होळी

हिंगोली (Hingoli Turmeric Farmer) : पिवळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंगोलीत हळदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप उसळला आहे. भाव कोसळल्याच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज वाशिम-जिंतूर महामार्गावर हळदीची होळी करत राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. 

शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६,००० रुपये प्रति क्विंटलवर असलेला (Hingoli Turmeric Farmer) हळदीचा भाव शेतकर्‍यांच्या घरात येताच थेट १२,००० च्या खाली घसरला आहे. खाजगी व्यापारी 'बटाव'च्या नावाखाली शेकडा दोन रुपये वसूल करून शेतकर्‍यांची लूट करत असल्याचा आरोपही करण्यात आला. व्यापारी रोख रक्कम न देता आरटीजीएसद्वारे उशिरा पैसे देतात आणि ने निश्चित केलेल्या दराने खरेदी करत नाहीत, अशा तक्रारी शेतकर्‍यांनी मांडल्या. यापूर्वी काल, हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट बंद पाडून शेतकर्‍यांनी निषेध नोंदवला होता. आजच्या आंदोलनात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सतीश इडोळे, तालुका अध्यक्ष प्रवीण मते, शांतीराम पाटील, मनोहर सावके पाटील यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

'हळदीचे भाव तातडीने वाढले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हिंगोलीची हळद फेकून निषेध करू,' असा इशारा संघटनेने दिला. आंदोलना दरम्यान गोरेगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक झळके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेतकर्‍यांचे निवेदन हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव नारायण पाटील, विशाल गुंडेवार व सेनगाव बाजार समितीचे बुळे यांनी स्वीकारले. सरकारने हळद प्रक्रिया उद्योग उभारण्याचे प्रयत्न केले असले तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यांना योग्य भाव मिळत नसल्याने हिंगोलीतील शेतकरी आक्रमक झाला आहे.

Related to this topic: