राम नवमी मिरवणूक

राम नवमी मिरवणूकीत कर्णकर्कश डिजे वाजविल्याने चौघावर गुन्हा दाखल 

Ram Navami procession: शहरामध्ये राम नवमी निमित्ताने २६ मार्चला बँन्ड, ढोल ताशा व डिजेच्या निनादात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

राम नवमी मिरवणूकीत कर्णकर्कश डिजे वाजविल्याने चौघावर गुन्हा दाखल 

Ram Navami procession

हिंगोली शहर पोलिसांच्या अटी व शर्तीचे केले उल्लंघन

हिंगोली (Ram Navami procession) : शहरामध्ये राम नवमी निमित्ताने २६ मार्चला बँन्ड, ढोल ताशा व डिजेच्या निनादात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या परवान्यातील अटीचे व शर्तीचे उल्लंघन करून कर्णकर्कश डिजे वाजविल्याने ध्वनी प्रदूषण केल्या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सध्या सन व उत्सव सुरू झाले आहेत. यामध्ये डिजेचा वापर करू नये, या संदर्भात पोलिस प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. २६ मार्च रोजी हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून राम नवमी निमित्ताने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत घोडेस्वार, डिजे, बँन्ड, ढोल ताशा आदींचा वापर करण्यात आला होता. या मिरवणूक निमित्ताने पोलिसांनी दिलेल्या परवान्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे हिंगोली शहर पोलिसात गुरूवारी रात्रीच्या सुमारास संजय तोडेवाले यांनी रितसर तक्रार देण्यात आली.

ज्यामध्ये मिरवणूकीमध्ये (Ram Navami procession) डिजे वाद्याचा जोर जोराने आवाज केला जात असल्याने पोलिसांनी आवाज कमी करण्या करीता वारंवार सांगुनही त्याचा आवाज कमी न करता डिजे जोरात कर्णकर्कशपणे मर्यादीपेक्षा जास्त आवाजात वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याने हिंगोली शहर पोलिसात वाहनचालक सागर बबन लोखंडे रा. एनटीसी हिंगोली, वाहन मालक रोहीत फकीरा पुरी, रा. तलाबकट्टा हिंगोली, मिरवणूकीचे अध्यक्ष व सदस्य महेश चक्रवार, अध्यक्ष लखन कुरील रा. गाडीपुरा हिंगोली या चौघावर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोटे हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026