Public Works Department

शासकीय बांधकामांवरील एकूण ३० टक्क्यांपर्यंतची अतिरिक्त तरतूद होणार टप्प्याटप्प्याने रद्द

​​​​​​​नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल क्षेत्रातील शासकीय बांधकामांच्या अंदाजपत्रकातील अतिरिक्त दरांबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

शासकीय बांधकामांवरील एकूण ३० टक्क्यांपर्यंतची अतिरिक्त तरतूद होणार टप्प्याटप्प्याने रद्द

Public Works Department

आदिवासी क्षेत्राची १० टक्के वाढ रद्द; नक्षलग्रस्त भागाची २० टक्के तरतूद यंदा ५ टक्क्यांवर तर २०२७-२८ पासून शून्यावर

गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल क्षेत्रातील शासकीय बांधकामांच्या अंदाजपत्रकातील अतिरिक्त दरांबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नक्षलग्रस्त भागासाठी असलेली अतिरिक्त २० टक्के तरतूद २०२६-२७ मध्ये ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली असून, १ एप्रिल २०२७ पासून ती पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी बहुल क्षेत्रातील अतिरिक्त १० टक्के दरवाढही पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने १३ ऑगस्ट रोजी याबाबत स्वतंत्र शासन परिपत्रके जारी केली आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रानुसार गडचिरोली जिल्ह्याचा ‘अतिप्रभावित जिल्हा’ या वर्गवारीतून समावेश वगळून ‘वारसा व विशेष लक्ष केंद्रित जिल्हा’ या वर्गवारीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नक्षलप्रभावाच्या स्थितीत झालेली लक्षणीय सुधारणा लक्षात घेता अतिरिक्त २० टक्के तरतुदीची आवश्यकता नसल्याचे तसेच त्यामुळे प्रकल्पांच्या खर्चात अनावश्यक वाढ होत असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार २०२६-२७ मध्ये अतिरिक्त तरतूद ५ टक्के आणि २०२७-२८ पासून शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आदिवासी बहुल क्षेत्रातील बांधकामांसाठी राज्य दरसूचीवर असलेली अतिरिक्त १० टक्के वाढही शासनाने पूर्णपणे रद्द केली आहे. या भागातील उपलब्ध सुविधा आणि शासनाचे बचतीचे धोरण विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, आता या क्षेत्रातील बांधकामांसाठी सामान्य क्षेत्राप्रमाणेच राज्य दरसूचीतील दर लागू होतील.

या निर्णयामुळे नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल क्षेत्रातील शासकीय बांधकामांच्या अंदाजपत्रकातील एकूण ३० टक्के अतिरिक्त दरांची तरतूद कमी होऊन यावर्षी केवळ ५ टक्के आणि पुढील वर्षापासून शून्यावर येऊन शासकीय निधी खर्चात मोठी बचत होणार आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026