'देशोन्नती'ने केली पोलखोल

विधानसभा क्षेत्रात सध्या विकासाचा दावा करत विविध उपक्रम राबवले जात आहेत.

'देशोन्नती'ने केली पोलखोल

Poor Construction

आदासा पाणंद रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे संतापाची लाट

धापेवाडा (Poor Construction) : विधानसभा क्षेत्रात सध्या विकासाचा दावा करत विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, याच क्षेत्रातील आदासा पाणंद रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचाराचे भीषण वास्तव 'देशोन्नती'ने उघड केल्याने खळबळ उडाली. रस्त्यावर वरून मुरुमाचा लेप आणि खाली मातीचा खेळ तसेच फुटलेले पाईप टाकण्यात आले. ही वस्तुस्थिती चव्हाट्यावर आल्यानंतर यंत्रणेने कामात सुधारणा करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. आदासा पाणंद रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे संतापाची लाट आहे. बळीराजाच्या पैशावर डल्ला मारणारी 'भ्रष्ट ठेकेदारी' थांबवा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भ्रष्ट ठेकेदारी थांबवा

कंत्राटदाराने मुरुमाऐवाजी काळी माती टाकली. निकृष्ट साहित्य वापरून काम उरकले. सदर वृत्त दै. 'देशोन्नती' वृत्तपत्रात प्रकाशीत झाल्यावर सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाल्याने प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली आहे. निकृष्ट काम उघड झाल्यावर काही प्रमाणात मुरुम टाकून रस्ता व्यवस्थित केला जात असल्याची माहिती आहे. कंत्राटदाराने आधीच अंदाजपत्रकानुसार काम केले असते, तर आज ही नामुष्की ओढवली नसती,' अशी चर्चा शेतकरी वर्गात आहे. विशेष म्हणजे कामावर देखरेख ठेवणारे काही तरुण एका शिक्षण संस्थेशी संबंधित असून, त्याचा शासकीय यंत्रणेशी काय हितसंबंध आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या कामात मोठे गौडबंगाल असल्याचा संशय बळावला आहे. संपूर्ण क्षेत्रातील कामांची निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, कंत्राटदाराचे खिसे भरण्याचा नाही

दै. देशोन्नतीत प्रकाशीत वृत्ताची दखल घेत यंत्रणेकडून कामात सुधारणा केली जात आहे. मात्र, रस्त्याची केवळ वरवरची मलमपट्टी नको आहे. आदासा रोड ते ब्रह्मपुरी रोड शिव पाणंद रस्त्यावर नियमानुसार मुरुमाचा ५ ते ६ इंच जाड थर आणि रुंदी हवी आहे. तसेच फुटलेले पाईप बदलून नवीन दर्जेदार पाईप टाकावे. शासकीय अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत या कामाची देयके प्रशासनाने काढू नये.

-विलास ठाकरे, त्रस्त शेतकरी

संबंधित सामग्री

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

Oct 04, 2026
कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा. विशेष न्यायालयाने त्यांच्यासह अन्य आरोपींना दोषमुक्त केले.

Sep 26, 2026
अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून हरियाणा ACBने अटक केली. कुटुंबीयांनी मात्र रक्कम अधिकृत शुल्क असल्याचा दावा केला.

Sep 26, 2026
फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा; बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; राजकारणात चर्चांना उधाण

फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा; बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; राजकारणात चर्चांना उधाण

मुख्यमंत्री फडणवीसांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे. दिल्लीला जाण्यापूर्वी बावनकुळेंनी फडणवीसांची भेट घेतली.

Sep 12, 2026
नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अंबिका नगर येथे बाळ मित्र शिव सेवा मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्यानिमित्त महाआरती, नंदी बैल पूजा, गोपालकाला आणि बक्षीस वितरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sep 10, 2026