नंदगाव ग्राम पंचायत भ्रष्टाचार

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption

 

नंदगाव ग्राम पंचायत भ्रष्टाचाराच्या चौकशी साठी उपोषणाचा चौथा दिवस

नंदगाव (Nandgaon Gram Panchayat Corruption) : औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी १ ऑक्टोबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा रविवार रोजी चौथा दिवस उलटूनही पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराबाबत १५ जुलै आणि १० ऑगस्ट रोजी संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही चौकशी सुरू झाली नसल्याचा आरोप जैस्वाल यांनी केला आहे. यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना पूर्वसूचना देऊन उपोषण सुरू केले. दरम्यान, सलग चार दिवसांच्या अन्नत्यागामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून, रक्तदाब व रक्तातील साखरेचा त्रास जाणवत आहे. 

उपोषणस्थळी औंढा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (Nandgaon Gram Panchayat Corruption) प्रकृती खालावत असतानाही प्रशासनाकडून मागणीची दखल घेतली जात नसल्याने उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार जैस्वाल यांनी व्यक्त केला.

चार दिवसांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष 

ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, ही उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, चार दिवसांपासून उपोषण सुरू असतानाही औंढा नागनाथ पंचायत समिती तसेच हिंगोली जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.