Tanaha Pola

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अंबिका नगर येथे बाळ मित्र शिव सेवा मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्यानिमित्त महाआरती, नंदी बैल पूजा, गोपालकाला आणि बक्षीस वितरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

११ सप्टेंबरला शिव मंदिर परिसरात महाआरती, नंदी बैलाची पूजा, बक्षीस वितरण आणि गोपालकाला कार्यक्रम

नागपूर : अंबिका नगर, मानेवाडा रिंग रोड परिसरातील बाळ मित्र शिव सेवा मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अंबिका नगर येथील शिव मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

शनिवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तान्हा पोळ्यानिमित्त महाआरती, नंदी बैलाची पूजा तसेच विविध बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. यासोबतच गोपालकाला वितरणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

तान्हा पोळ्यानिमित्त सहभागी होणाऱ्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ५ हजार १ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार १ रुपये, तृतीय क्रमांकासाठी २ हजार १ रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी १ हजार १ रुपये आणि पाचव्या क्रमांकासाठी ५०१ रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय १०१ रुपयांची विशेष ११ बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील, पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, माजी आमदार सुधाकररावजी कोहळे, अतुल लोंढे, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे तसेच ज्योती नितीन डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाचे संयोजन नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलासभाऊ करांगळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांच्या सहभागातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तान्हा पोळा हा महाराष्ट्रातील पारंपरिक सण असून, या निमित्ताने बालगोपालांकडून सजविलेल्या बैलांच्या प्रतिकृतींची पूजा केली जाते. या परंपरेचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अंबिका नगर व परिसरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बाळ मित्र शिव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

माथाडी निरीक्षक भरतीवर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; नागपूरच्या एका केंद्रावरील २४ विद्यार्थी मेरिटमध्ये

माथाडी निरीक्षक भरतीवर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; नागपूरच्या एका केंद्रावरील २४ विद्यार्थी मेरिटमध्ये

माथाडी निरीक्षक भरतीत कथित गैरप्रकाराचा सुषमा अंधारेंचा आरोप. नागपूरच्या एका केंद्रावरील २४ उमेदवार मेरिटमध्ये; चौकशी आणि फेरपरीक्षेची मागणी.

Oct 15, 2026
जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागपूर मनपाची २४ तास सेवा; ५ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागपूर मनपाची २४ तास सेवा; ५ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

नागपूर मनपाच्या जन्म-मृत्यू विभागात २४ तास कामकाज सुरू; ५ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित. CRS पोर्टलच्या अडचणींमुळे प्रमाणपत्रांसाठी १५ ते २० दिवसांची प्रतीक्षा.

Oct 12, 2026
विधान परिषदेच्या 5 जागांचे चित्र स्पष्ट; बंडखोर मैदानातच, महायुती-मविआचे टेन्शन वाढले!

विधान परिषदेच्या 5 जागांचे चित्र स्पष्ट; बंडखोर मैदानातच, महायुती-मविआचे टेन्शन वाढले!

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारांचे चित्र स्पष्ट. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडखोरांमुळे महायुती-मविआचे टेन्शन वाढले.

Oct 09, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026