पातूर : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील आवश्यक सोयी-सुविधांची पूर्तता करण्यासाठी पातूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात ईदगाह व परिसराची स्वच्छता करण्यासोबतच शहरातील मुख्य रस्त्यांची साफसफाई करावी, बंद पडलेले स्ट्रीट लाईट तातडीने दुरुस्त करावेत, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा तसेच वाहतूक व्यवस्थेची योग्य सोय करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शहरातील कब्रिस्तानाचीही स्वच्छता करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या प्रसंगी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष हिदायत खान, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद, माजी सरपंच शब्बीर अली, माजी सरपंच बब्बू भाई, मो. हयात जमदार, मो. महताब पहलवान, अनीक पटेल, मो. शाकीर, सै. नईम, मो. शारीक, सै. ईरफान, मो. आरिफ, इनायत खान, मो. खिराजोद्दीन, ताहेर पहलवान, शेख इरफान, सलाउद्दीन, शेख मुख्तार यांच्यासह शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पातूरमध्ये रमजान ईदसाठी वाढीव सोयी-सुविधांची मागणी
पातूर शहर काँग्रेस कमिटीने ईदच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयी-सुविधांसाठी नगर परिषदेला निवेदन दिले. स्वच्छता व वाहतूक व्यवस्थापनावर भर देण्यात आला.
संबंधित सामग्री
चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार
Chardham Yatra Record: यंदा केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन
आगीतील जखमी कर्मचार्यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर
Municipal President Rekhatai Bangar: शहरांमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग लागून घडलेल्या घटनेत आगीत होरपळलेल्या जखमी नगरपालिका कर्मचार्यास प्रत्येकी एक लाखाची मदत नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर
ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!
Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..
दीड कोटींच्या सफाई टेंडरनंतरही कळमनुरी घाणीतच!
Kalamnuri Municipal Safai Tender: शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचे सफाई टेंडर काढले असतानाही शहरातील अस्वच्छता कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी
Chief Officer Prashant Bidkar: चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीत १ लाख रुपयांची मदत जमा केली.